सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन- बावनकुळे*

भारतीय जनता पार्टी चा आरोप आहे. की कोरोना काळात शेतकऱ्यांचे दूध संकलन कमी करण्यात आले. आणि जे संकलित दूध असतं ते नेत्यांच्या डेअरी च संकलित केलेलं असते.

Snehal Joshi .
  • Jul 20 2020 2:36PM
कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसाठी अनेक संकटं उभी राहिली. त्यात  एक महासंकट दूध संकलनाचे आहे.  भारतीय जनता पार्टी चा आरोप आहे. की कोरोना काळात  शेतकऱ्यांचे दूध संकलन कमी करण्यात आले.  आणि जे संकलित दूध  असतं ते नेत्यांच्या  डेअरी च संकलित केलेलं असते.
 कोरोना  महामारी च्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकऱ्यांवर परिस्थिती चा डोंगर कोसळला आहे. त्यात सरकारही अन्याय करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसंग्राम आणि भारतीय जनता पार्टी ने एक आंदोलन उभे केले आहे.
 आज 20 जुलै रोजी या आंदोलनाचे पहिले आवेदन सादर करण्यात आले. भाजपा आणि शिवसंग्राम यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आले.
 नागपूर शहरात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री व माजी  ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे निवेदन  उपविभागीय आयुक्त ना देण्यात आले.  तर नाशिक शहरात शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात 
आले.  नगर जिल्ह्यात शेतकरी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडाला  दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केले. 
 या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे. सोबतच दुधाची प्रतिलिटर 30 रुपये किंमत  करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली असून 1 ऑगस्ट पर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही तर *राज्यव्यापी दूध संकलन बंद* महाआंदोलन करण्याचा इशारा देखील  भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार