सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आज आसना पूलाचे भूमिपूजन व जाहिर आभार सभा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होणार*

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होणार*

Sudarshan MH
  • Jan 22 2021 6:36AM
 
नांदेड दि.२२(अरविंद जाधव):-नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील आसना नदीवर कार्यान्वित असलेल्या दोन पूलांपैकी एक पूल नादुरुस्त असल्यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होत होती.या बाबीकडे विशेष लक्ष पूरवित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी आसना नदीवरील जुन्या पूलाची दुरुस्ती व रुंदीकरण यासाठी मंजूरी मिळवून घेतली असून वाहतूकीची समस्या आता मिटणार आहे.या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या पूल दुरुस्ती व रूंदीकरण कामाचे भूमीपूजन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आज दि.22 जानेवारी रोजी होणार असून याच ठिकाणी एका जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.361 राष्ट्रीय महामार्गावरील नांदेड- अर्धापूर दरम्यानच्या आसना नदीवर गुरु त्ता गद्दीच्या निमित्ताने नवीन पूलाची निर्मिती करण्यात आली होती.त्यानंतर जूना पुल वाहतूकीसाठी जवळ जवळ बंद करण्यात आला होता.एकाच पूलावरून येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती.यापार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल राज्य शासनाकडून दुरुस्ती व रूंदीकरणासाठी मंजूर करुन घेतला आहे.आज दि.22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असून यानंतर एका जाहिर आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर,विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हंबर्डे,माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे,उपमहापौर मसूद अहेमद खान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे अर्धापूर तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे,शिवसेना तालुका प्रमुख संतोष कपाटे, राष्ट्रवादीचे अ‍ॅड.सचिन देशमुख, नगरसेविका श्रीमती कौशल्याबाई पूरी,सौ.करुणा कोकाटे,उमेश पवळे यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार