सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भरदिवसा व्यापा-याला पाच लाख रुपयाने लुटले, आरोपी सिसीटिव्हीत कैद पुसद येथील घटना

प्राप्त माहितीनुसार पुसद शहरातील आडते व्यापारी किशोर नंदलाल तोष्णीवाल यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते असुन त्यांचा नौकर श्रीरंग ग्यानबा ढोकणे वय ५५ हा नेहमी याच बँकेचा व्यवहार करतो.

Sudarshan MH
  • Feb 26 2021 9:41AM
भरदिवसा व्यापा-याला पाच लाख रुपयाने लुटले, आरोपी सिसीटिव्हीत कैद पुसद येथील घटना..
प्राप्त माहितीनुसार पुसद शहरातील आडते व्यापारी किशोर नंदलाल तोष्णीवाल यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते असुन त्यांचा नौकर श्रीरंग ग्यानबा ढोकणे वय ५५ हा नेहमी याच बँकेचा व्यवहार करतो. बऱ्याच दिवसापासुन चोरी करणारे त्यांच्या मागावर होते. आज ढोकणे नेहमीप्रमाणे  बँकेत पैसे काढून तोष्णीवालकडे ५ लाख रुपये पोहचविण्यासाठी बँकेच्या समोर आले आणि मोटरसायकलची डिक्की खोलली आणि त्यामध्ये पैसे ठेवत असतांना अचानक अज्ञात इसम तेथे आला आणि त्यांनी आपले १०० रू. खाली पडले आहेत असे म्हणताच ढोकणे १०० रु. घेण्यासाठी खाली वाकले तेव्हा दोन मोटारसाकलवर चार इसम त्या ठिकाणी आले आणि  ५ लाख रुपये घेवून पसार झाले. ढोकणे यांनी आरडा ओरड केल्या नंतर चोरटे धुम ठोकुन पसार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन व ठाणेदार पांडुरंग फाडे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रथम संपुर्ण शहराला नाकाबंदी केली. आणि सिसीटिव्ही फुटेज पाहिले त्यामध्ये ५ लाख चोरतांना अज्ञात इसम दिसुन आले आणि मोटरसायकलवर पसार झाल्याचे दिसले. दरम्यान संपुर्ण शहरातील मुख्य रस्त्यावर त्या चोरांचा पोलिस तपास करित आहेत. या घटनेची माहिती फिर्यादी श्रीरंग ग्यानबा ढोकणे वय ५५ वर्षे रा. श्रीरामपुर यांनी तक्रार दिली. शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा वृत्त लिहिपर्यंत शोध चोराचा लागला नाही.
प्रतिनिधी किरण मुक्कावार पुसद जिल्हा यवतमाळ

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार