सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉ शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त २७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला

Nandurbar MH
  • Jan 22 2022 8:41PM


तळोदा प्रतिनिधी - अक्षय भगवान कलाल
२७ वर्षांपासून रक्तदानाचा उपक्रम सुरू.…
 भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान  शिबिराला रक्तदात्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात विक्रमी २७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान या रक्तदान शिबिराचे हे २७ वे वर्ष होते....
      डॉ. वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. राजेश पाडवी व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र कुमार गावित पं. स. सभापती यशवंत ठाकरे,सदस्य विजय राणा , दाज्या पावरा, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ कलाल, भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस राजेंद्र राजपूत, जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस प्रविणसिंग राजपूत, भाजपा तळोदा शहर प्रमुख योगेश चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील, संघटन सरचिटणीस निलेश माळी, दगडू शिरोळे, प्रकाश शिरोळे, प्रशांत कोतकर, रमेश मालपुरे, सुनिल शिरोळे, रवींद्र मोराणकर, संजय वाणी, श्री. साईनाथ शिक्षण संस्थेचे संचालक गुलाबराव चव्हाण, निसार मकरानी, जगन मराठे आदी उपस्थित होते.  या महारक्तदान शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा आदि गावांमधून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांकडून रक्त संकलनासाठी नंदुरबार येथील नवजीवन रक्तपेढी व जनकल्याण रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. यात नवजीवन रक्तपेढीचे डॉ. सुनील चौधरी, रोहिदास जाधव, कैलास पाटील, गजानन चौधरी, सुदाम चौधरी, चंद्रकांत धनगव्हाळ, पांडुरंग गवळी तसेच जनकल्याण रक्तपेढीचे डॉ अर्जुन लालचंदाणी, प्रकाश भोई, पुष्पा नायक, सोनिया गावित, रोहित शिंदे, खलील काझी, आकाश जैन, अमोल माने, मदतनीस गोरख भील व संजय सूर्यवंशी यांनी काम पाहिले. 
  कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईनाथ शिक्षण संस्थेचे संचालक आदित्य मालपुरे, अभिषेक मालपुरे, कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी.एम. पाटील, जांभीपाणी येथील विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ईश्वर चौधरी, हरी भारती, भूषण येवले, हंसराज महाले, दिनेश मराठे, दीपक मालपुरे, मनोज चिंचोले, पुरुषोत्तम चिंचोले, भीमा महाले, रतिलाल मराठे, पुरुषोत्तम चिंचोले, संदीप जयेश कोळी, महेश वायकर, महेश सैंदाणे आदींसह शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.....

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार