सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू...

आग नक्की कशामुळे लागली या बाबत चौकशी केली जाईल . मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असेही सांगितले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गृहमंत्री अमित शाहा तर मग नागपूर शहराचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सोबतच प्रत्येक पार्टीचे नेते भंडारा जिल्ह्यातील भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पालकांचे सांत्वन करीत आहेत. आणि योग्य ती मदत देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत असे देखील. राजकीय नेत्यांचे व सामान्य जनतेचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत...

Snehal Joshi .
  • Jan 9 2021 11:11PM
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले,सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.  या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, घटनेची विस्तृत माहिती घेऊन  वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.   मरण पावलेल्या 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली तसेच या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.  या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांनी ७ बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी येऊन मृत बालकांच्या पालकांचे सांत्वन केले आणि मृत बाळांचे शवविच्छेदन करण्यात येणार नाही. तर प्रत्येक बाळाच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा देखील त्या वेळेस राजेश टोपे यांनी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गृहमंत्री अमित शाहा तर मग नागपूर शहराचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सोबतच प्रत्येक पार्टीचे नेते भंडारा जिल्ह्यातील भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पालकांचे सांत्वन करीत आहेत. आणि योग्य ती मदत देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत असे देखील. राजकीय नेत्यांचे व सामान्य जनतेचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत... 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार