सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी : महापौर

कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात - महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पहिला डोस

Sudarshan MH
  • Apr 1 2021 5:53PM
 
 
 प्रतिनिधी:-दिपक चव्हाण
 
पुणे,कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असून लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. चौथ्या टप्प्यात लसीकरणासाठी मनपा हद्दीतील नागरिकांची संख्या १५ लाखांपर्यंत असून या चौथ्या टप्प्यासाठी आपल्या सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
कोरोना लसीकरण मोहिमेच्या शहरातील चौथ्या टप्प्याची सुरुवात महापौर मोहोळ यांना पुणे महानगरपालिकेच्या सुतार दवाखान्यात लस देऊन करण्यात आली. महापौर मोहोळ यांनी 'मेड इन पुणे' असलेल्या कोविशील्ड लसीचा डोस घेतला.
 
लसीकरण झाल्यानंतर महापौर म्हणाले, 'कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तर वेगाने आणि व्यापक लसीकरण आणि तपासण्या वाढवण्याकडे आपला कल आहे. आताच्या कालावधीत कोरोना लस ही 'संजीवनी'प्रमाणे असून पात्र असलेल्या नागरकांनी वेळ न दवदडता लस घ्यावी.'
 
'लसीकरण केंद्रावरील सुरवातीच्या टप्प्यात आलेल्या अडचणी आता पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. शिवाय लसीची आवकही मुबलक झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही शंका मनात न ठेवता लसीकरणासाठी पुढे यावे. चौथ्या टप्प्यात जवळपास १५ लाख नागरिक लसीसाठी पात्र झाले आहेत. या मोठ्या संख्येनुसारच लसीकरण केंद्रांची सज्जता ठेवली जात आहे', असेही महापौर म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार