सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरबीआयची येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई

आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई केली आहे.

Shruti Patil
  • May 28 2024 12:32PM

मुंबई: रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई केली आहे. या मोठ्या बँकांवर कारवाई केल्यानंतर त्यांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. बँकिंग रिझर्व्ह बँकेने सांगितले की, दंड ठोठवण्यात आलेल्या बँका मध्यवर्ती बँकेच्या अनेक महत्त्वपूर्ण नियमांचे उल्लंघन करत आहेत. या नियमांचे पालन न केल्याने येस बँकेला ९१ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

येस बँक आणि आयसीआयसीआय बँक अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचे आरबीआयने सांगितले. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेवर ग्राहकांच्या सेवा तसेच कार्यालयीन खात्यांशी निगडित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक काळात आरबीआयसमोर अशी अनेक प्रकरणे आली आहेत, ज्यात बँकेने अपुऱ्या शिलकीमुळे ग्राहकांच्या खात्यांमधून शुल्क वसूल केले. त्याशिवाय कार्यालयीन खात्यांमधून बेकायदेशीर कामे केली जात होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार