सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बंजारा समाजाची बदनामी थांबवा यासाठी उमरखेड ठाणेदारांना बंजारा समाजाचे निवेदन.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पूजा चव्हाण आणि त्यांचे आई-वडील तसेच त्यांच्या संपूर्ण परिवारासह बंजारा समाजाची बदनामी होत आहे.

Sudarshan MH
  • Mar 2 2021 4:18PM
बंजारा समाजाची बदनामी थांबवा यासाठी उमरखेड ठाणेदारांना बंजारा समाजाचे निवेदन
 
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पूजा चव्हाण आणि त्यांचे आई-वडील तसेच त्यांच्या संपूर्ण परिवारासह बंजारा समाजाची बदनामी होत आहे पूजा चव्हाण ही आमच्या बंजारा समाजाची मुलगी असून तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे चव्हाण परिवाराच्या दुःखात आम्ही समस्त उमरखेड तालुक्यातील बंजारा समाज सहभागी आहोत परंतु दररोज पूजा चे फोटो समाज माध्यमांमध्ये दाखवून काही ऑडिओ क्लिप व्हायरल करून चरित्र हनन चालू आहे या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असताना आणि आमचा पोलिस प्रशासनावर संपूर्ण विश्वास आहे तरी पूजा चव्हाण प्रकरणात वारंवार चरित्र हनन केल्या जात आहे या प्रकरणाला कंटाळून खुद्द पूजा चव्हाण यांच्या वडिलांनी असे म्हटले आहे की जर तुम्ही आमची बदनामी नाही थांबवली तर आम्ही संपूर्ण परिवारासह आत्महत्या करू यामुळे आमच्या बंजारा समाजाची नाहक बदनामी होत आहे हे थांबण्यासाठी उमरखेड येथील ठाणेदार श्री चौबे यांना निवेदन दिले. पीडितिने आत्महत्या केली की काय याचा तपास पोलीस करीत आहे परंतु बदनामी करणाऱ्या त्या भाजपच्या व्यक्तीवर आणि प्रसार माध्यमावर गुन्हे दाखल करा यासाठी निवेदन दिले. यावेळी रविकांत रुडे अरुणाबाई राठोड गोपाल राठोड सुरेश राठोड विलास जाधव मधुकर जाधव संतोष जाधव राम राठोड तसेच बंजारा समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार