सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार - शहादा तालुक्यातील फेस बामखेडा येथे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न

बामखेडा येथील कला महाविद्यालयात मराठी विभाग,राष्टीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन

NandurbarMH
  • Feb 27 2021 8:55PM
नंदुरबार - शहादा तालुक्यातील फेस बामखेडा येथे मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम संपन्न
 बामखेडा येथील कला महाविद्यालयात मराठी विभाग,राष्टीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने " मराठी भाषा गौरव दिन "निमित्ताने आँनलाईन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दिनांक 27 फेब्रुवारी २०२१ रोजी महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गाच्या व्हाटसअँप गृपवरती आँनलाईन कार्यक्रमाची लिंक विद्यार्थ्यांना पाठविण्यात आली. 
  या ऑनलाइन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वाय.आर.पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजन आणि माल्यार्पन करण्यात आले.प्रमुख वक्ते डॉ.हषर्दा पुराणिक यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा सविस्तर आढावा घेतला. महत्वपुर्ण कवितांचा आणि नाट्यकृतीचा परिचय करुन दिला आणि शासकीय व्यवहारात सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे.असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वाय.आर. पाटील यांनी मराठी साहित्यावर सविस्तर रित्या प्रकाशझोत टाकला.मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज आहे कारण ती आपल्या अस्मितेची भाषा आहे, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. या ऑनलाईन व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापकवर्ग, , शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सी.एस.करंके यांनी आणि सूत्रसंचलन प्रा. ए. एम. गोसावी यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रा. वाय.सी.गावीत यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार