सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फसवणुकीच्या गुन्ह्यात बाळासाहेब नेवाळेना अटक बाळासाहेब नेवाळे यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बाळासाहेब नेवाळे यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Sudarshan MH
  • Feb 22 2021 7:50PM

 
प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे
 
पुणे:मावल तालुक्यातील राजकीय नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दखल करत अटक करण्यात आली आहे . विकास सोसायटीत बनावट मतदार यादी तयार करून स्वतः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत स्वतः उमेदवार असल्याचा बनावट प्रस्ताव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल करून फसवणूक केल्या प्रकरणी बाळासाहेब नेवाळे यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कामशेत पोलिसांनी अटक केली आहे . त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीना २५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
बाळासाहेब शंकर नेवाळे (वय ४९ मावळ), प्रकाश महादू गायकवाड, बापू बनाजी धडस( रा. कामशेत ) व बाळू धाकलू आखाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रकाश महादू गायकवाड, बापू बनाजी धडस, बाळू धाकलू आखाडे अद्याप फरार आहेत.
 
   गोवित्री ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुक २०१५ च्या निवडणुकी साठी बनवण्यात आलेल्या मतदार यादीत बाळासाहेब नेवाळे यांची संस्थेचे सभासद नसताना प्रकाश महादू गायकवाड, बापू बनाजी धडस व बाळू धाकलू आखाडे यांनी बनावट मतदार यादी तयार केली. नेवाळे यांचा बनावट सभासद नंबर टाकून आणि ती बनावट मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सबमिट केली. त्याचबरोबर (दि.२४ डिसेंबर २०१९) रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभासद पदाच्या निवडी करिता सोसायटीकडून पाठवण्यात येणारा एक उमेदवार स्वतः बाळासाहेब नेवाळे आहेत असा संचालकांची मीटिंग घेऊन प्रस्ताव तयार करून सदरचा बनावट व खोटा प्रस्ताव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केला.
 
त्यामुळे कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नेवाळे यांना अटक केली असुन अन्य तीन आरोपी फरार आहेत. नेवाळे यांना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली आहे. .या गुन्ह्यातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम हे करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार