सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बजेट अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे-- ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मागणी*

हिवाळी अधिवेशन नागपुरात आयोजित न करता मुंबईत आयोजित करण्यात येत असेल तर अर्थसंकल्पी(बजेट) अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

Snehal Joshi .
  • Nov 10 2020 11:27PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपुरात आयोजित न करता मुंबईत आयोजित करण्यात येत असेल तर अर्थसंकल्पी(बजेट) अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीने कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत हे अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात आजवर एक/ दोनदाच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झालेले नाही. "नागपूर येथे अधिवेशनानिमित्ताने 8 हजार पोलिसांसह एकूण 18 हजार कर्मचारी आले असते. आयसीएमआरने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागपुरात डिसेंबर महिन्यात थंडीच्या लाटेमुळे नागपूर आणि परिसरात कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागपूर ऐवजी मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र विदर्भातील प्रश्नांना सोडविण्यासाठी आणि विदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे अधिवेशन होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पी अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे," अशी मागणी ऊर्जामंत्री राऊत यांनी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार