सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उत्तर प्रदेश राज्यसभेत भाजप चा दणक्यात विजयी

उत्तर प्रदेशातल्या राज्यसभेच्या जागांसाठी निकाल घोषित झाले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवता आला आहे.

Snehal Joshi .
  • Nov 2 2020 11:57PM
उत्तर प्रदेशातल्या राज्यसभेच्या जागांसाठी निकाल घोषित झाले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीला प्रत्येकी एकेक जागा मिळवल्या. काँग्रेसला बाबाजीचा ठुल्लू मिळाला आहे. यामुळे राज्यसभेचं गणित पुरतं बदललं आहे. उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे राज्यसभेत फक्त एकुलते एक खासदार आता शिल्लक राहिले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेत काँग्रेसचे एवढे कमी खासदार असतील! भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, अरुण सिंह, ब्रिज लाल, नीरज शेखर, गीता शाक्य, हरिद्वार दुबे, बी एल वर्मा आणि सीमा द्विवेदी यांना राज्यसभेत पाठवलं गेलं. उत्तर प्रदेश आणि उत्तरांखंडमधील राज्यसभेच्या 11 जागांचे निकाल समोर आले आहेत. यात सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभेतलं काँग्रेसचं संख्याबळ एवढं कमी झालं आहे. सध्याच्या घडीला काँग्रेसचे राज्यसभेत नीचांकी 38 खासदार आहेत, तर भाजप खासदारांची संख्या 92 झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा विचार केला तर सध्या 112 NDA खासदार राज्यसभेत आहेत. आणखी 10 जागा मिळाल्या तर लोकसभेबरोबर राज्यसभेतही NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार