सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य सेवा आयोगाच्या परिक्षेत घोळ, पेपर फुटल्याचा भाजयुमोला संशय..!

नियमांची पायामल्ली करून वेळेच्या दिड तास अगोदर पेपर फुटल्याचा संशय भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगराच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Snehal Joshi .
  • Jan 23 2022 11:17PM
आज संपुर्ण राज्यात राज्य सेवा आयोगाची परिक्षा होती. नागपुरातही अनेक केंद्रावर ही परिक्षा झाली. पण नागपुरातील साऊथ पॅांईट शाळा, क्रिडा चौक येथील केंद्रावर संशयास्पद घटना घडल्या. पेपरची वेळ १० वाजताची निर्धारित असतांना देखील पेपरचे संच हे सकाळी ८ः३० वाजताच फोडण्यात आले. एकुण २० संचापैकी ७ संच हे सकाळीच फोडण्यात आले. जेव्हा की नियम असे आहेत की पेपरचे संच फोडण्याच्या वेळी तेथे २ विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे व त्यांच्या समोर संच उघडल्या गेले आहेत याचा पुरावा म्हणुन त्या विद्यार्थ्यंची सही घेणे देखील अनिवार्य आहे. असा काहीही प्रकार या केंद्रावरती घडलाच नाही. तसेच पेपर ही निर्धारीत वेळेपासुन १५ मिनीटे उशीरा परिक्षार्थ्यांना देण्यात आला. नियमांची पायामल्ली करून वेळेच्या दिड तास अगोदर पेपर फुटल्याचा संशय भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगराच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर लगेच भाजयुमोचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचले. केंद्रावरील लिपीक, केंद्र प्रमुख व शाळा प्रशासनाच्या सोबत चर्चा केल्यानंतर त्यांचे उत्तर हे चुक झाल्याचे सांगण्यात आले. राज्य सेवा परिक्षांचा मागील सर्व घोळ लक्षात घेता ही चुक नसुन मुद्दमुन पेपर फोडण्यात आला असल्याचा आरोप युवा मोर्चाच्या माध्यमातुन करण्यात आला.

भारतीय जनता युवा मोर्चा जेव्हा केंद्र प्रमुखांना बदलण्याची मागणी करत होते तेव्हा बळजबरीने पोलिसांच्या माध्यमातुन दबाव टाकण्यात येत होता.
जेव्हा जिल्हाधिकार्यांशी व पोलीस आयुक्तांशी संपुर्ण विषयाची माहिती देऊन चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांनी विषयाची दखल घेऊन केंद्र प्रमुखांना तात्काळ बदलवुन ३ः०० वाजताचे पेपर नविन परिक्षा केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत घेण्यात आले. 

संपुर्ण विषय भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवाणी दाणी वखरे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.
यानेळी प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, बादल राऊत, सनी राऊत, सचिन सावरकर, संकेत कुकडे, गौरव हरडे, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, हर्षल वाडेकर, अमित बाराई, रिद्धू चोले, मोहित भिवंकर, अथर्व त्रिवेदी,रितेश पांडे, प्रणित पोचमपल्लीवर, तेजस भागवातकर, सिद्धार्थ नखाते, प्रणय उमाठे, सतीश घुले, अनिकेत ढोले, रोहित बघेल,अनुप साळवे, शुभम समुद्रे,सनी झेंडे,अश्विन निमजे, तुषार झंझाळ, पवन महाकाळकर,समीर येवले, ज्ञानेश्वर हेडाऊ,पवन खंडेलवाल,समीर मांडले,यश पांडे,सोनु वर्मा,रोहीत नंदनवार,प्रभात जैन,आशु तांबे, मोनु मणे, प्रशांत दुर्गे, उदय आसवाले, अमीत पांडे,अनमोल पोतारे,अनिकेश,वैभव संबारे लोखंडे,हितेश देवले,निशांत सावंत, आशु शिवनकर उपस्थित होते.
  
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार