सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरपना येथे विविध मागण्यांसाठी भाजपचे आंदोलन.*

महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आज १७ जुलै, रोज शुक्रवारला बस स्थानक चौक कोरपणा येथे आंदोलन करून प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले,

Snehal Joshi
  • Jul 17 2020 11:02PM
भारतीय जनता पार्टी कोरपना च्या वतीने महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आज दिनांक १७ जुलै, रोज शुक्रवारला बस स्थानक चौक कोरपणा येथे आंदोलन करून प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले, कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून लोक डाऊन सुरू आहे, त्यामुळे गोरगरीब, सामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे त्यामुळे शेतकरी,मजूर,व सामान्य जनता आर्थिक संकटाशी सामना करत असताना विद्युत बिल चार ते सहा पट जास्त आल्याने सामान्य जनता होरपळून गेली आहे,त्यामुळे वीज बिलाची रक्कम भरणे शक्य नसल्यामुळे राज्य सरकारने त्वरित वीज बिल माफ करण्यात यावे,तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवास स्थानावर हल्ला केलेल्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्यातील रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्‍यांना तात्काळ निधी उपलब्ध करण्यात यावा, गोरगरीब नागरिकांकरिता राज्य सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करावे या मागण्या घेऊन कोरपना शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करून प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर ,रमेश पा.मालेकर, किशोर बावणे, नगरसेवक अमोल आसेकर, नगरसेवक सुहेल अली,अड,पवन मोहितकर भारत चन्ने, विजय पानघाटे,अबरार अली, सत्यवान घोटेकर, पुंडलिक उलमाले, पद्माकर दगडी, देविदास झाडे, रिजवान शेख ,समीर पटेल ,अभय डोहे ,शंकर चिंतलावर, दिवाकर रासेकर, आदीची प्रामुख्याने उपस्थित होती,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार