सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या,अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू- माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा

राज्यातील 72 लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा 5 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असा इशारा माजी ऊर्जामंत्री व भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिला.

Snehal Joshi .
  • Feb 2 2021 8:38PM
महावितरणने राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. कोरोना तसेच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेला वीज बिल माफी न देता उलट त्यांच्या जगण्यावर घाला घालण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडी सरकार करीत आहे. अशा जनता विरोधी सरकारचा धिक्कार आणि महावितरणचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ताला ठोको आंदोलन करण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी भाजपाने राज्यभर मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर ` ताला ठोको व हल्लाबोल`आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार