सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*सांकेतिक धरणे आंदोलन म्हणजे शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी दिलासा ची मागणी*

भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण च्या वतीने आज नागपूर शहरातील संविधान चौकात, पाच महत्त्वाचे मुद्दे घेऊन सांकेतिक धोरणे आंदोलन करण्यात आले.

Snehal Joshi
  • Jun 14 2020 1:06AM
कोरोना लॉक डाऊन, टोळधाड, पिक विमाची पूर्तता न होणे, कापूस खरेदी नाही, शेतकऱ्यांचे दूध वाया, शेतकरी खोट्या बियाण्यांचे बळी, नव्या हंगामासाठी पीक कर्ज अशा अनेक प्रश्नांना भाजप ने सरकारच्या नजरे पुढं ठेऊन, त्याची तातडीने पूर्तता व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण च्या वतीने आज नागपूर शहरातील संविधान चौकात, पाच महत्त्वाचे मुद्दे घेऊन सांकेतिक धोरणे आंदोलन करण्यात आले. या सांकेतिक धरणे आंदोलनात शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सांकेतिक वस्तू हाती घेऊन मागण्या करण्यात आल्या. यात प्रामुख्याने * कापसाला प्रति क्विंटल 2 हजार रुपये प्रमाणे भावांतर योजना लागू करा. * शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करा. * दूध खरेदी दर वाढवून द्या. * शेतकऱ्यांना खते-बी-बियाणे शेताच्या बांधावरच द्या. * शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने द्या. या मागण्यांचा समावेश मुख्यत्वे होता. सोबतच करोना लॉक डाऊन च्या स्थितीत सामान्य जनतेचे खिसे रिकामे झाले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे 300 युनिट वीजबिल माफ करा. अशी मागणी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील दोन महिन्यांपासून ऊर्जा मंत्र्यांना केली आहे. त्याचा देखील परत एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला गेला. म्हणजेच हे सांकेतिक धरणे आंदोलन शेतकरी बांधवांचा सोबतच सामान्य जनतेसाठी पण दिलासा देण्यारे ठरू शकत.या आंदोलनात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. विकास महात्मे, माजी नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, डॉक्टर पोद्दार उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार