सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वरीष्ठ व निवड श्रेणीसाठी भाजप शिक्षक आघाडीचे पाच पर्याय

कार्यवाही न झाल्यास आंदोलन - भाजप शिक्षक आघाडी

Snehal Joshi .
  • Feb 24 2021 8:29PM

शिक्षण विभागाने 2014 पासून वरिष्ठ वेतन श्रेणीचे शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन न केल्यामुळे हजारो शिक्षकांना सेवेची 12 व 24 वर्ष होऊनही वेतन श्रेणी लागू न झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे या विषयाची गंभीर दखल घेत भाजप शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र संयोजिका डॉ कल्पना पांडे व पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , मा शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व मा राज्यशिक्षणमंत्री बच्चूभाऊ कडू यांना शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले .

शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागु करण्याबाबत शासनाची अडचण लक्षात घेता भाजप शिक्षक आघाडीने पाच पर्याय देखील सुचविले आहे कारण शासन निर्णय 31 जुलै 2019 अन्वये 18 महिन्याचा कालावधी झाल्यावरही त्रीस्तरीय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचा अहवाल मा. आयुक्तांच्या अभ्यासगटाने अद्यापही सादर केलेला नाही व शासन निर्णय 26 ऑगस्ट 2019 चा प्रशासनाने जाणीवपूर्वक आपल्या सोयीचा अर्थ लावून महाराष्ट्रातील शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणीच्या हक्काच्या लाभापासून मुद्दाम व जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचा कट रचला असल्याचा आरोप पूर्व विदर्भ संयोजक अनिल महादेवराव शिवणकर यांनी केला आहेत.

हजारो पात्र शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये शासनाप्रति प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहेत. महाराष्ट्रातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्या करिता भाजप शिक्षक आघाडीने दिलेल्या पर्याया पैकी कोणताही एक पर्याय शासनाने निवडल्यास शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पर्याय क्र. 1) त्रीस्तरीय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करावी. पर्याय क्र. 2) वरिष्ठ व निवड श्रेणी करिता प्रशिक्षणाची अट रद्द करावी व तसे स्वयं स्पष्ट शासन निर्णय निर्गमित करावे. पर्याय क्र. 3) हमीपत्राच्या आधारे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करावी. पर्याय क्र. 4) शिक्षण विभागा मार्फत घेण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कोणत्याही अन्य प्रशिक्षणांचा एकत्रित विचार करून वरिष्ठ व निवड श्रेणीस ग्राह्य करावे. पर्याय क्र. 5) 31 मार्च 2021 पर्यंत किमान 10 दिवसाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. महाराष्ट्रातील पात्र शिक्षकांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही याकरिता वरिल पैकी कोणताही एक पर्याय स्विकृत करून तात्काळ शासन निर्णय निर्गमित करावा अन्यथा भाजप शिक्षक आघाडी तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे भाजप शिक्षक आघाडीच्या डॉ कल्पना पांडे , डॉ उल्हास फडके , अनिल शिवणकर जिल्हा संयोजक प्रदीप बिबटे , मेघशाम झंजाळ ,रमेश बोरकर , कैलास कुरंजेकर , लिलेश्वर बोरकर , स्वरूप तारगे , अरुण रहांगडाले , गुरुदास कामडी ,मनोहर बारस्कर , सौ मायाताई हेमके, अरुण पारधी ,रंजीव श्रीरामवार , सचिन कालबांडे , रजनीकांत बोंदरे , मोहन मोहिते , यांनी सांगितले .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार