सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपाचे प्रदेश पदाधिकारी घोषित केले असून भाजपाचे तरूण सहमुख्य प्रवक्ते तसेच माध्यम संपर्क प्रमुख केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.

Snehal Joshi
  • Jul 4 2020 1:47PM
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपाचे प्रदेश पदाधिकारी घोषित केले असून भाजपाचे तरूण सहमुख्य प्रवक्ते तसेच माध्यम संपर्क प्रमुख केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.   श्री. उपाध्ये हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ भाजपात काम करीत आहेत. तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये प्रथम त्यांच्या टीममध्ये प्रवक्ते म्हणून उपाध्ये यांची नियुक्त केली. अभ्यासू वृत्ती, पत्रकारीतेची पार्श्वभूमी आणि पक्की वैचारीक बैठक याबरोबरच राजकीय व सामाजिक जाण यातून त्यांनी प्रवक्ते म्हणून अल्पावधीतच छाप पाडली. सर्व मराठी तसेच हिंदी, राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.   अभाविपची पार्श्वभूमी असलेले उपाध्ये यांनी पुण्याच्या रानडे इस्ट्यिट्यूट येथून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. दै पुढारी, दै लोकसत्ता, मुंबई तरूण भारत या दैनिकात त्यांनी काम केले. मुळात पत्रकार असल्याने केशव उपाध्ये यांनी वृत्तपत्रे, ब्लॉग, तसेच समाज माध्यमातून पक्षाची बाजू मांडणारे लेखन तसेच इतर सामाजिक आणि ललित विषयांवर देखील विपुल लेखन केले आहे   रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या दोन अभ्यास गटांत त्यांचा समावेश होता. नक्षल चळवळीचा छ्त्तीसगडच्या विकासावर होणारा विपरित परिणाम यावर २००६ साली संशोधनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केला. हा अहवाल प्रबोधिनीने प्रसिद्ध केला. सोलापूर दंगलीनंतर प्रबोधिनीने पाठवलेल्या सत्यशोधन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार