सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*भाजपच्या महिला मूकमोर्चा ची ऊर्जा मंत्रांच्या घरी धाड.*

भारतीय जनता पार्टीने राज्यात जनतेला लॉकडाउनच्या काळात सरसकट वाढवून आलेल्या विजेच्या बिलाची दुरुस्ती करा.आणि 300 युनिट माफ, 28 जून पर्यंत पूर्ण करा. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यात धरतीवर भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निवासस्थानी धडक दिली.

Snehal Joshi
  • Jul 7 2020 1:41PM
भारतीय जनता पार्टीने राज्यात जनतेला लॉकडाउनच्या काळात सरसकट वाढवून आलेल्या विजेच्या बिलाची दुरुस्ती करा.आणि 300 युनिट माफ, 28 जून पर्यंत पूर्ण करा. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यात धरतीवर भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निवासस्थानी धडक देत लॉक डाऊन काळातील विजेचे अवास्तव बिल रद्द करण्याची मागणी पूर्ण करा. अन्यथा सत्ता सोडा असा इशाराही या महिलांनी दिला आहे. covid-19 लॉक डाऊन काळातील अन्यायकारक वाढवी विद्युत बिल रद्द करा. प्रत्येक महिन्याला 100 युनिट प्रमाणे तीन महिन्याचे 300 युनिट माफ करा, विद्युतबिला वरील अधिभार रद्द करा, विद्युत शुल्क कमी करा, ऑनलाइन बिल भरलेल्या जनतेला सुधारित विद्युत बिल पाठवा. 7 टक्के विद्युत बिल दरवाढ एक वर्षासाठी स्थगित करा, 3महिन्यांचे बिल वेगळे करून ते पाठवा, आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन पुकारले आहे. महाविकास आघाडी सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने भाजपाच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी नागरिकांसह ऊर्जा मंत्र्यांच्या बेझनबाग येथील घरासमोर धडक दिली.अनेक महिलांशी संवाद साधला असता त्यांनी या पुढचा इशारा हा अजून कडक असेल, आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील दिला, तर घराचे बजेट हे स्त्रियांना सांभाळावे लागतं, विद्युत बिल वाढीमुळे आमचे बजेट मोडले आहे असेही महिला कार्यकर्त्यांनी सांगितले. महापौर मनीषा कोठे, माजी महापौर मायाताई इवनाते, माजी महापौर अर्चना डेहनकर, नंदाताई जिचकार, शिवानी दाणी, मनीषा काशीकर, लता येरखेडे, मंगला गोतमारे, सुषमा चौधरी, प्रतिभा माथरानी, नीता ठाकरे, कल्पना पजारे , भाग्यश्री कानतोडे, कांचन करमरकर, किरण शर्मा दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटील, स्वाती अखत कर, माया फुलबांधे, राखी शिंगारे, उज्वला राऊत आदीसह जवळपास पाचशे महिला कार्यकर्त्या या धडक मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार