सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सर्वसामान्य नागरिकांकडून अवाजवी बीलांची आकरणी तत्काळ थांबवा अन्यथा महावितरण विभागाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार भाजप आमदार महेश लांडगे

जनआंदोलन उभारणार भाजप आमदार महेश लांडगे

Sudarshan MH
  • Mar 27 2021 3:22PM
 
प्रतिनिधी :- दीपक चव्हाण पिंपरी चिंचवड
 
पिंपरी-चिंचवडमधील शहरांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरिक, लघु उद्योजक व सर्वसामान्य नागरिक हतबल झाली असून. शहरामध्ये महावितरण विभागाकडून शहरामधील लघु उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांनवर दबावतंत्राचा वापर करून विज कनेक्शन कट करून दुप्पट दिले वसूल करण्याचे काम सध्या शहरांमध्ये सुरू असून महावितरण विभागाच्या मनमानी कारभारा विरोधात आता भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.....
 
 
आमदार लांडगे यांनी याबाबत महावितरण विभागला हे एका प्रसिद्ध द्वारे निवेदन देण्यात आले आसुन आमदा लांडगे म्हणाले कि कोरोना महामारीचे संकट पुन्हा पिंपरी-चिंचवडकरांवर ओढावले आहे.शहरात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन आपआपल्या परीने या संकटाचा सामना करीत आहे. सर्वसामान्य नागरिक तणावात आहेत. अशी प्रतिकूल परिस्थिती असताना महाविरण प्रशासनाकडून अवाजवी बीलांची आकरणी केली जात आहे. बील भरणा न केल्यास कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे लघु उद्योजक, सामान्य नागरिक, गृहिणींमधून महाविरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. उन्हाळा सुरू झाला आहे, प्रत्येक घरात वीज अत्यावश्यक बाब आहे. आर्थिकदृष्ट्या संकटाचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे एक-दोन महिन्याचे बील निर्धारित वेळेत भरले नाही, म्हणून लगेच वीज कनेक्शन तोडून नागरिकांना त्रास देण्याची भूमिका प्रशासनाने घेवू नये.
अन्यथा महावितरण विरोधात जनआंदोलन उभारणार!
 
 
पिंपरी-चिंचवड शहाराचा लोकप्रतिनिधी म्हणून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या व छोट्या-मोठ्या व्यवसायिकांच्या भावना सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणे आमचे कर्तव्य आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात सरकारला वीज पुरवठा खंडीत करु नका… अशी विनंती केली होती. मात्र, सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्र्यांनी कार्यवाही केली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या मनमानी विरोधात रस्त्यावर उतरणे, आंदोलन करणे उचित नाही. पण, आपण आपली लढाई सनदशीर मार्गाने लढणार आहोत. गेल्या वर्षभरात नागरिकांना दिलेली वाढीव बीले अयोग्य आहेत. वाढीव बिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मग, तक्रारी विचारात न घेताच वीज कनेक्शन हुकुमशाहीपद्धतीने तोडले जात आहे. याविरोधात प्रसंगी आम्ही पिंपरी-चिंचवडकर जनआंदोलन उभारणार आहोत, असा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार