सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर DCC त नाणेफेकीवर भाजपचा उमेदवार जिंकला; काॅंग्रेस सत्तेत

लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होती. १९ जागांसाठी हाेणा-या निवडणूकीत दहा जागेवर भाजपा प्रणित लोकशाही पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज बाद ठरल्याने उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक पार पडली.

S.n.ranjankar
  • Nov 22 2021 3:41PM
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होती. १९ जागांसाठी हाेणा-या निवडणूकीत दहा जागेवर भाजपा प्रणित लोकशाही पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज बाद ठरल्याने उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक पार पडली. आज साेमवार जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसच्या सहकार पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे.आजच्या मतमाेजणीत देवणी येथील एका जागेवरील दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. काँग्रेसच्या सहकार पॅनलचे गोविंद बिराजदार भोपणीकर आणि भाजपाच्या लोकशाही पॅनलचे भगवानराव पाटील तळेगांवकर यांच्यात समान मते पडल्याने नाणेफेक घेण्यात आली. त्यात भाजपचे भगवानराव पाटील तळेगांवकर हे विजयी झाले. अन्य आठ जागांवर काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.यामध्ये शिरूर अनंतपाळ विविध कार्यकारी सोसायटी गटातून व्यंकटराव पाटील, मजूर सहकारी संस्था गटातून दिलीप मलशेट्टी पाटील नागराळकर, इतर मागासवर्गीय गटातून अनुप ज्ञानोबा शेळके, महिला गटातून अनिता प्रभाकर केंद्रे आणि स्वयंप्रभा धनंजय पाटील, नागरी सहकारी बँक आणि पतसंस्था गटातून अशोक वसंतराव गोविंदपूरकर, अनुसूचित जाती आणि जमाती गटातून पृथ्वीराज हरिश्चंद्र शिरसाट, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय गटातून सपना पांडुरंग किसवे हे निवडून आले आहेत. या सर्वांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार