सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राम मंदिर उभे राहण्या आधी आपलं मनात अयोध्या तयार व्हायला हवी - सरसंघचालक

मर्यादा पुरुषोत्तम “प्रभु श्रीराम यांच्या चरित्रातील पुरुषार्थ प्रत्येक राम भक्तांच्या अंतर्मनात आहे. आपल्या सगळ्यात राम आहे. इथे अयोध्येत भव्य मंदिर होत आहे. सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे.

Snehal Joshi .
  • Aug 5 2020 10:32PM
मर्यादा पुरुषोत्तम “प्रभु श्रीराम यांच्या चरित्रातील पुरुषार्थ प्रत्येक राम भक्तांच्या अंतर्मनात आहे. आपल्या सगळ्यात राम आहे. इथे अयोध्येत भव्य मंदिर होत आहे. सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील देऊळ तयार होईल, त्याचे पुढील दायित्व आपले नाही. ते प्रत्येकाचे वाटल्या गेले आहे. मात्रआपल्या सगळ्या मनातील अयोध्येला सजवायचं आहे. सगळ्यांची उन्नती करणारा धर्म, त्याचा ध्वज खांद्यावर घेऊन सगळ्या विश्वाला सुखशांती देणारा भारत आपण निर्माण करू या , त्यासाठी आपल्याला मनातील अयोध्या साकार करायची आहे. जसं जसं मंदिर निर्माण होईल, तसं तसं हे राम मंदिर उभं राहण्याआधी आपलं मन मंदिर अयोध्या तयार व्हायला हवी . त्याची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी   भागवत यांनी अयोध्येत राममंदिर भूमिपूजनानंतर बोलताना केले.  अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोहनजी भागवत यांनी संबोधित केलं. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यापासून मंदिराच्या कामाला सुरूवात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंदिराची पायाभरणी झाली असून, लवकरच कामालाही सुरूवात होणार आहे. असे सांगून  सरसंघचालक भागवत म्हणाले, “ हा आनंदाचा क्षण आहे. एक संकल्प घेतला गेला होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरासांनी  सांगितलं होतं की, २०-३० वर्ष काम करावं लागेल. तेव्हा हे पूर्ण होईल. प्रयत्न केले. अनेकांनी बलिदान दिलं. रथयात्रा करणारे आडवाणीही आज घरातून हा कार्यक्रम बघत असतील. अनेकजण उपस्थित राहू शकले असते, पण परिस्थिती तशी नाही. जगाचं कल्याण करणारा भारत स्वतःच्या कल्याणाचा शुभारंभ आज आणि या व्यवस्थेचं नेतृत्व समर्थ हस्ते होतेय. याचाही आनंद आहे,” असं भागवत म्हणाले. राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने ५०० वर्षांची प्रतिक्षा संपली असल्याचे प्रतिपादन  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना केले. ५०० वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. “या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसंच शांततेच्या मार्गाने समस्येचं निराकरण कसं केलं जातं हे दाखवून दिलं आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे,” असे  योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. 

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार