सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*5 ऑगस्ट अयोध्येत उतरणार का ठाकरेंचे विमान...जनतेत संशयकल्लोळ*

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का, ही चर्चा आता सुरू झाली आहे.

Snehal Joshi .
  • Jul 20 2020 9:39PM
अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यास सर्वोच्च न्यायालयानं हिरवा झेंडी दाखवल्यानंतर आता तिथं मंदिर उभारण्याच्या तयारीला वेग आला आहे. मंदिराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार याची चर्चा निकाल लागल्यापासूनच सुरू होती. आता ५ ऑगस्ट ही तारीख सरकारनं भूमिपूजनासाठी निश्चित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं नाव यात सर्वात आघाडीवर आहे.शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना याबाबत भूमिका मांडली. 'भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण येईल किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही. तो काही आमच्यासाठी मानापमानाचा विषय नाही. कारण आमचं नातं थेट श्रीरामाशी जोडलेलं आहे. निमंत्रण देण्याचं काम आयोजकांचं आहे. ते आल्यास कोणी जायचं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. स्वत: जायचं की आणखी कोणाला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं याचा निर्णय तेच घेतील,' असं सावंत म्हणाले. 'प्रभू श्री रामचंद्र हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. त्याला राजकारणाचा रंग कोणी भरू नये. पण राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही शिवसेना आहे हे लक्षात घ्यायला हवं. संतांचे सर्व आखाडे लढत होते. कायद्याची लढाई सुरू होती हेही आम्हाला मान्य आहे. यात श्रेय घेण्याचा विषय नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेले होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी ५ कोटींची देणगी देणारी शिवसेना हा देशातील पहिली संघटना आहे, म्हणूनच राम मंदिर च्या कार्यकारणी ते उद्धव ठाकरे यांना आग्रहाचे निमंत्रण राहील यात शंकाच नाही.... मात्र जनसामान्य उपस्थितीच्या चर्चेत रंगली असून, चातक पक्षाप्रमाणे त्या क्षणाची वाट आहे. त्यांच्या मनात मात्र संशयकल्लोळने गोंधळ घातलेला दिसून येतो. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार