सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांचे विरोधात दाखल केलेली फौजदारी तक्रार मा. न्यायालयाने केली खारीज

काँग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल देशमुख, सचिन वाजे प्रकरणातील रु. १०० कोटी च्या वसुली आरोपामुळे राज्य सरकार ची व महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची बदनामी होत आहे असे सांगून भा जा प नेते श्री किरीट सोमय्या यांचे विरोधात  नागपूर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

Snehal Joshi .
  • Jan 19 2022 11:50PM
काँग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी अनिल देशमुख, सचिन वाजे प्रकरणातील रु. १०० कोटी च्या वसुली आरोपामुळे राज्य सरकार ची व महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची बदनामी होत आहे असे सांगून भा जा प नेते श्री किरीट सोमय्या यांचे विरोधात  नागपूर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड विधान च्या कलम ४९९, ५०३, ५०४ व ५०५ (i) अंतर्गत भा जा प नेते श्री किरीट सोमय्या यांचे विरोधात  कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री अतुल लोंढे यांनी या तक्रारी द्वारे मा न्यायालयास केली होती. 

सदर तक्रार सुनावणीसाठी आली असता मा न्यायालयाने खालील निष्कर्षासह दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी श्री अतुल लोंढे यांची तक्रार खारीज केलेली आहे. 

 मा न्यायालयाचे आदेशातील निष्कर्ष :-

(१) तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी त्यांचे तक्रारीत केलेले आरोप हे निश्चित स्वरूपाचे नाहीत (NOT SPECIFIC) व संदिग्ध आहेत (VAGUE)

(2)  तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी त्यांचे तक्रारीत केलेले आरोप हे  कोणत्याही व्यक्तिविशेष च्या विरोधात असलेले आढळून येत नाहीत. 

(३) तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी त्यांचे तक्रारीत केलेले आरोपावरून हे दिसून येत नाही कि तक्रारीत नमूद केलेल्या तथाकथित अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कोणाची बदनामी (defamation) होत आहे किंवा कोणाचा जाणीवपूर्वक अपमान (insult)होत आहे किंवा  कोणाला धमकी (intimidation) देण्यात येत आहे किंवा कोणत्याही व्यक्ती व व्यक्तींच्या समूहविरोधात  शत्रुत्व (enmity) , द्वेष (hatred) व गैर भावना (illwill) पसरविण्यात येत आहे. 

(४) त्यामुळे तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी त्यांचे तक्रारीत केलेले आरोप हे भारतीय दंड विधान च्या कलम ४९९, ५०३, ५०४ व ५०५ (i)  च्या व्याख्येनुसार सिद्ध होत असल्याचे दिसून येत नाही. 

(५) त्यामुळे तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी त्यांचे तक्रारीत केलेले आरोपात सकृद्दर्शनी काहीही  तथ्य आढळून येत नाही व त्यामुळे तक्रारीत नमूद केलेलं आरोपी श्री किरीट सोमय्या यांचे विरोधात समन्स जारी करण्याचे काही कारण नाही. 

(६) त्यामुळे तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात येत आहे. 


अशा निरीक्षणासह तक्रारदार श्री अतुल लोंढे यांनी दाखल केलेली तक्रार Cri.M.A. No. 4091/2021 मा न्यायाधीश श्रीमती  एस. एस. गवई ( जे एम एफ सी कोर्ट क्र २, नागपूर) यांनी फेटाळून लावली आहे 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार