सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वडगाव गुंड येथील सुपात्या डोंगरावरील वृक्षारोपण जाळण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न.....

निघोज महसुल मंडळातील वडगाव गुंड

Sudarshan MH
  • Nov 26 2020 12:49PM
अहमदनगर पारनेर (रावसाहेब पारधी)
 
निघोज महसुल मंडळातील वडगाव गुंड येथील सुपात्या डोंगराला काही समाजकंटकांनी
रात्री आग लावली. यावर्षीच्या पावसाळ्यात येथील डोंगरावर  भैरवनाथ  मंदीर ग्रामविकास ट्रस्ट, वडगाव ग्रामविकास प्रतिष्ठाण व लोकजागृती सामाजिक संस्था
यांनी सुमारे १७०० विविध जातीच्या वृक्षांची लागवड केली
आहे. यामधे ४०० विविध जातींच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. तर काही दुर्मीळ जातीचे वृक्षसंवर्धन येथे केलेले आहे. यातील सुमारे १५०० रोपांना संरक्षक जाळीचे  कुंपण
बसवून ठिबक सिंचन करण्यात आले आहे. पाण्याच्या सुविधेसाठी कुकडी कालव्याजवळील विहीरीवरून १० हॉवर्स पॉवरचा  पंप बसवून  
१० लाख लिटर क्षमतेचे कागद बसवून शेततळेही तयार केलेले आहे.
येथे सुमारे दोन किलोमिटरचा धावण्याचा ट्रॅक  तयार केला आहे.
यासाठी आजपर्यंत जवळपास 
सुमारे अठरा लाख रुपये खर्च झाला आहे. येथील सुपाईमाता या देवस्थानाचे छोटेशे मंदिराचे कामही भाविकांनी चालु केले आहे.हा सर्व खर्च लोकसहभागातुन ग्रामस्त व पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
या सर्व २४ एकरच्या सुपात्या पठारावर हा समाजहिताचा प्रकल्प उभा राहत असताना 
येथील काही समाजकंटनां ते 
पाहवत नसल्याने त्यांनी या पुर्वी या प्रकल्पाला  विरोध केला होता.
त्याबाबत तक्रार प्रशासनाकडे गेल्या महिन्यात केलेली होती, परंतु  त्यांनी  त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काल रात्री येथे आग लावून  हा प्रकल्प नष्ट करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत.
त्यांच्यावर शोध घेवून कारवाई होण्याची मागणी आम्ही करत आहे. 
 येथील डोंगरावर  दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी दररोज शंभरहुन अधिक नागरीक येत आहेत.
त्यांच्या श्रमदानातुन एक चांगला
प्रकल्प येथे आकार घेत असताना 
त्याला विरोध केला जातो आहे.
    येथील सर्व जमीन हि महसुल विभागाच्या मालकिची असुन तीच्यावर अतिक्रमण करू पाहणारे असा प्रकार करून त्रास देत असावेत  असा संशय आहे.
शासणाच्या या जागेत असा पर्यावरण संवंर्धन  प्रकल्पासाठी महसुल प्रशासणाची परवानगी घेण्यात आलेली आहे.
दोन दिवसांपुर्वीच येथे अ. नगरचे
उप -जिल्हाधिकारी संदिप निचित यांनी भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली व उपक्रमाचे कौतुक केले आहे. येथे एक 
आगळे -वेगळे औषधी वनस्पतींचे
बन तयार करण्याचा माणस  येथील कार्यकर्त्यांचा आहे.
या चांगल्या कामाला कोणीही  विरोध  न करता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात
येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार