सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र राज्यात महिला असुरक्षित महिलांवरील अत्याचार कधी थांबणार पिंपरी चिंचवड म्हदे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने निषेध आंदोलन

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने निषेध आंदोलन

Sudarshan MH
  • Dec 30 2020 5:04PM



प्रतिनिधी : दिपक चव्हाण पुणे



भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड येथे महाविकासआघाडी सरकार च्या  विरोधात, राज्यातील स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराचा जाहिर निषेधदार्थ आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जिल्हा अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नुकतच संभाजीनगर येथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नौकरीचे आमीष दाखवुन एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, यावर राज्य सरकारने व पोलिसांनी त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आली आहे. 


यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष संकेत चोंधे यानी ह्या घटने चा निषेद करत ते म्हणाले की राज्य सराकार व्दारा शक्ती कायदा लागु  करण्यात आला असून परंतु या कायद्याअंतर्गत आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नासुन हा कायदा फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न याठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे संभाजीनगर म्हदील घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा तीव्र निषेध भारतीय जनता  युवा मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून त्याचबरोबर या  घटनेतील दोषींवर तात्काळ स्त्रीशक्ती कायदा नुसार कारवाई करण्यासाठी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या  वतीने राज्य सरकार व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे  पोलीस प्रशासनाने संभाजीनगर म्हदील घटने तील दोंषीवर शक्ती कायदा नुसार कठोर कारवाई करावी जर दोषींवर कठोर कारवाई नाही झाली तर युवा मोर्चातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा ईशारा भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संकेत सुरेश चोंधे यांनी राज्य सरकार व पोलिस प्रशासनाला दिला आहे

यावेळी आंदोलना मध्ये सहभागी झाले युवा मोर्चा युवती आघाडीतील प्रदेश युवती सहसंयोजिका सौ. वैशालीताई खाडे, सदस्य सौ. देवयानी भिंगारकर, सरचिटणीस तेजस्विनी कदम, चिटणीस मुक्ता गोसावी, पूजा आल्हाट, अंजली पांडे, सायली शहाणे, स्मिता रासकर, प्रियांका जाधव, चंद्रशीला बनसोडे, नयन पालवे, शुभांगी कसबे तसेच प्रदेश सदस्य अजित कुलथे, सरचिटणीस दिनेश यादव, जवाहर ढोरे, दिपक नागरगोजे, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, शिवराज लांडगे, मोहित बुलाणी, रामदास कुटे, जयदिप कर्पे, अतुल बोराटे, आदित्य कुलकर्णी, चिटणीस रवि जांभुळकर, प्रकाश चौधरी, मंगेश धाडगे, मंडल अध्यक्ष सन्नी बारणे, शिरीश जेधे, व्यापारी आघाडी संयोजक राजेश राजपुरोहित, क्रिडा संयोजक विवेक महाजन, सहसंयोजक प्रथमेश सकपाळ, सोशियल मीडीया संयोजक विक्रांत गंगावणे, विद्यार्थी आघाडी सहसंयोजक अनिकेत शेलार, वरद जोशी, तेजस मुळे, रूबेन सन्नी, सिद्धांत बिंगानीया.व भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार