सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या काही खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये विध्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

किमान पालकांनी जागरूक होऊन आपल्या लेकरांची करावी काळजी...

Sudarshan MH
  • Feb 17 2021 5:57PM
 
(योगेश शर्मा)
बुलढाणा : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता खाजगी कोचिंग क्लासेसच्या बाबतीत तहसीलदार यांनी कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करूनच क्लासेस सुरू ठेवण्याचे आदेश पारित केल्यानंतर खाजगी कोचिंग क्लास संचालकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्याठिकाणी भेट दिली असता मोठ्या प्रमाणावर काही खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये या नियमांना बगल देत आपल्या आर्थिक लाभाकरिता चक्क विध्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे प्रकार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी समोर आले. हे दृश्य बघून किमान पालकांनी तरी आपल्या लेकरांची काळजी घेऊन कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्यास या खाजगी कोचिंग क्लास संचालकांना भाग का बरं पाडू नये, हा सवाल उपस्थित होतो.दिनांक १५ फेब्रुवारी रोजी चिखलीचे तहसीलदार यांनी एक पत्रक काढून खाजगी कोचिंग क्लास संचालकांना सूचना केल्या होत्या की, कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करूनच आपले क्लासेस सुरू ठेवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश आल्यानंतर सुद्धा मागील दिड ते दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये आजही कोविड-१९ च्या नियमांना स्पष्टपणे बगल देऊन सर्रासपणे विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सुरू आहे.
 जेव्हापासून कोरोना ने आपला संसर्ग वाढवला आहे तेव्हापासून सोशल दिष्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी शासन आणि प्रशासनातर्फे करण्यात येत असून ते आजतागायत सुरू आहे. परंतु काही खाजगी शिकवणी वर्गांमध्ये एका मोठ्या खोलीत जवळपास ६० ते ७० विध्यार्थी कोंबून जवळजवळ बसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर सदर कोचिंग क्लास संचालकांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे येथे बहुतांश विध्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क नव्हते, तर स्वतः कोचिंग क्लास संचालक आणि तिथे कार्यरत लोकांच्या तोंडावर देखील मास्क नव्हता हे महत्वाचे. याबद्दल प्रशासन कोणती भूमिका घेणार ते महत्वाचे आहे.
 या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सेनेटाईजर सारखा प्रकार नजरेस न पडल्याने या बद्दल देखील विचारपूस केली असता सदर कोचिंग क्लास संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर सर्व प्रकारानंतर शहरातील सर्वच खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांना झालेल्या विचारपूसबाबत माहिती देऊन दबावतंत्राचा वापर करून काही खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नियमांना डावलून सुरू असलेल्या शिकवणी वर्गाबाबत कुठल्याही प्रकारची माहिती बाहेर पडणार नाही याबद्दलची खबरदारी घेण्यात आली.
 महत्वाचे म्हणजे, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता एकीकडे शासन-प्रशासन गंभीर असून दुसरीकडे मात्र शहरभरात कोविड-१९ च्या बाबतीत नागरिकांमध्ये भीती हवी तेव्हडी दिसून येत नसून साधा चेहऱ्यावर मास्क सुद्धा लावणे लोकांना जिव्हारी येत आहे. वेळोवेळी प्रशासनाकडून सूचना देऊन सुद्धा नागरिकांमध्ये त्या सूचनांचे पालन करणे जणू शक्यच होत नसल्याचा प्रकार सध्या सुरू आहे. तर लॉकडाऊनमुळे आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भविष्य खराब होऊ नये या सार्थ भीतीपोटी पालकांनी आपल्या पाल्यांना खाजगी शिकवणी वर्गात दाखल करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबद्दलची काळजी घेतली, परंतु, शैक्षणिक नुकसाना सोबतच आपल्या लेकरांच्या आरोग्याची सुद्धा काळजी करणे महत्वाचे असून आता पालकांनी स्वतः या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आग्रही आणि वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन ती पूर्ण करवून घेणे फार महत्वाचे असून पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना शिकवणीसाठी पाठवतांना कोविड-१९ च्या नियमांबद्दल माहिती देऊन हे नियम सक्तपणे पालन करण्यास भाग पाडावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही..

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार