सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खेड चे अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठेवीदारांना 55 कोटी ची फसवणूक प्रकरणी चार संचालकांचा जामीन फेटाळला.....

ठेवीदारांना 55 कोटी ची फसवणूक प्रकरणी चार संचालकांचा जामीन फेटाळला.....

Sudarshan MH
  • Mar 10 2021 3:39PM
 
प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे।          
 राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हजारो ठेवीदार लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारे व अनधिकृत पणे आळेफाटा येथे माऊली मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड नावाने ,तसेच उज्जवलम ऍग्रो मल्टी ,व संकल्प सिद्धी च्या नावाने लोकांना दामदुप्पट चे आमिष ,व महागड्या आलिशान गाड्या बक्षिसे लालच दाखवून 55 कोटी रुपयांची ठेव ठेवायला भाग पाडून ती परत न करता परस्पर पैसे अफरातफर केल्या प्रकरणी आळेफाटा पोलिसात आर्थिक गुन्हे शाखेने 11 जून 2019 रोजी गुन्हा दाखल केलेला होता .
 
त्यावेळी माजी ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे संदीप पाटील यांचे मार्गदर्शना खाली व गुन्हे अन्वेषण चे पद्माकर घनवट यांचे पथकातील आर्थिक गुन्हे शाखेचे dysp राजेश कदम यांचे आदेशानुसार api नेताजी गंधारे यांनी गुन्हा दाखल करून सदर तपास उत्कृष्ट पणे करत कंपनी ची काही मालमत्ता जप्त पण करण्यात आली होती .यातील मुख्य आरोपीविष्णू रामचंद्र भागवत ला नाशिक च्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती .त्यांनतर 2020 मध्ये पुण्यात जुन्नर ची पोलिस कस्टडी संपल्यावर विष्णू भागवत व इतर 4 संचालक लोकांची रवानगी येरवडा येथे करण्यात आली आहे करण्यात आली आहे.यातील कंपनी चा मुख्य म्होरक्या विष्णू रामचंद्र भागवत राहणार गवंडवाडी येवला नाशिक ,संतोष सुदाम कोरडे बोरी बु जुन्नर पुणे ,सुरेश सीताराम घंगाळे राजुरी जुन्नर हल्ली नाना भालेराव कॉलनी बालकृष्ण अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ,निलेश जनार्धन कुंभार मूळ घोडेगाव तालुका आंबेगाव हल्ली भैरव अपार्टमेंट डोबी मळा मंचर आंबेगाव पुणे डॉक्टर विशाल मुरलीधर सुपेकर गुरुकुपा हॉस्पिटल पारनेर जि.अहमदनगर इ आरोपींनी खेड सत्र न्यायालयात जामीन साठी अर्ज केला होता तो अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री नरेंद्र ब्रम्हे साहेब यांनी सरकारी अभियोक्ता श्री प्रसन्न जोशी सो यांचे युक्तिवाद ऐकल्यावर तसेच खाजगी वकील अँड. निलेश आंधळे यांनी केलेला युक्तिवाद मान्य करत जामीन अर्ज फेटाळला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांचे आदेशाने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली अर्थिक गुन्हे चे नवनियुक्त दयानंद निम्हण यांनी सदर आरोपींना जामीन न मिळण्यासाठी पोलिसांची बाजू सक्षम पणे मांडली 
या प्रकरणी मूळ फिर्यादी बाळासाहेब सावकार म्हस्के व रामकृष्ण म्हस्के यांची 3 कोटी 93 लाख रुपये फसवणूक झाल्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या फिर्यादीसारखे इतर कोणीही आमिषाला बळी पडू नये असे मत देखील यावेळी बोलताना अँड. निलेश आंधळे यांनी व्यक्त केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार