सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निष्काम कर्मयोगी समर्पित भावनेने अटलजी जीवन जगले - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

Sudarshan MH
  • Dec 26 2020 6:15PM
(योगेश शर्मा)
बुलडाणा : भगवान श्रीकृष्णांनी गितेमध्ये जो निष्काम कर्मयोग सांगितला. तो प्रत्यक्ष कृतीतून व आचारणातून साकारणारे सर्वात्तम उदाहरण म्हणजे श्रद्धेय अटलजी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बैलगाडीने प्रवास करून जनसंघाचा दिवा प्रत्येक गावात पोहचविला. पक्ष कार्यासाठी अतिशय परिश्रमाने नमे कर्मफले स्पृहा या गितेच्या संदेशाने संपुर्ण जीवन समर्पित भावनेने जगले. त्यांचा आदर्श नवीन पिढीने घ्यावा असे विचार अभिवादन कार्यक्रमात व्यक्त्यांनी व्यक्त केले.
आज दि. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी  पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होेते. प्रारंभी अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमानिमित्त कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून कार्य करणार्‍या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा, अ‍ॅड. व्ही. डी. पाटील, जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, प्रदेश प्रतिनिधी माजी आ. विजयराज शिंदे, महिला आघाडी  प्रमुख सिंधु खेडेकर, उपाध्यक्षा विजया राठी, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
राजकारणातले अजात शत्रु ः गोकुल शर्मा
अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी माझा प्रत्येक संपर्क 1980 मध्ये विधानसभा निवडणूक प्रचार सभेमध्ये झाला. ही सभा रात्री 1 वाजता टिळक नाट्य मंदिराच्या समोर झाली. त्यावेळी माझ्याकडे भाजपा सचिव पदाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचे स्वागत मंचावर माझ्या हस्ते झाले. त्यानंतर 1985 ला नगराध्यक्ष झाल्यानंतर नागपूर येथे पक्षाचे अधिवेशन होते. त्या दरम्यान वसंतराव भागवत यांनी माझी त्यांच्याशी भेट करून दिली. त्यावेळी माझ्या पाठीवरून हात फिरवत नगर पालिकेचे अधिकार वाढले पाहिजे असे आवर्जून सांगितले. 1996 ला निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांचे आवर्जून भेट घेतली. असा जुन्या आठवणींना माझी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांनी उजाळा दिला.
राजकारणातले आदर्श व्यक्ती अटलजी ः अ‍ॅड. व्ही. डी. पाटील
मी केवळ राजकारणात येण्याचे मुख्य कारण म्हणजे राजकारणतले आदर्श व्यक्ती अटलजींच्या विचाराने  प्रेरित होऊन या क्षेत्रात कार्यरत झालो. 1974 ला नागपूर येथे पहिल्यांदा त्यांचे भाषण जवळून ऐकले.  तसेच 1996 ला निवडणुकी दरम्यान त्यांची सभा बुलडाण्यात होती. माझ्यावर त्यांच्या निवास भोजनाच्या प्रबंधकाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्याशी जवळून संबंध आला. 1967 ला जनसंघाच्या काळात लोकसभा उमेदवार किसानलाल संचेती, विधानसभा उमेदवार दामोधर पाटील यांच्या प्रचारार्थ गांधी भवन येथे सकाळी 7.30 वाजता सभा झाली. तसेच 1980 ला विधानसभा निवडणूकीत केशवराव बाहेकर यांच्या प्रचारासाठी रात्री 1 वाजता पार पडलेल्या सभेला जवळून ऐकण्याची संधी मिळाली. अशा जून्या आठवणी अ‍ॅड. व्ही. डी. पाटील यांनी सांगितल्या.
सर्व पक्षाचे आदर्शव्रत व्यक्तीमत्व ः माजी आ. शिंदे
भाष्यवर प्रवृत्त मधाळ वाणीतून आपल्या भाषणाची वक्तृत्वाची छाप विरोधकावर पाडणारे सर्व पक्षाला आदर्शव्रत व्यक्तीमत्व केवळ अटलजींचे होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी जनसंघ व भाजपाचे संघटन केले. त्यांचा आदर्श नवीन पिढीने घेतला पाहिजे असे विचार भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. विजयराज शिंदे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कोरोना काळातील योद्धा असणारे नपाचे सफाई कामगार विजय इंगळे, समाधान जाधव, आनंद गायकवाड, संजय गायकवाड, आरोग्य विभाग कर्मचारी कैलास बेंडवाल, नगरसेवक अरविंद होंडे  यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन प्रभाकर वारे यांनी केले. या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या वर्षा पाथरकर, अलका पाठक,नंदिनी साळवे, नगरसेवक गोंविद सराफ, मंदार बाहेकर, वैभव इंगळे, अ‍ॅड. प्रदिप कविमंडन, दत्ता पाटील, माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले, डॉ. राजेश्वर उबरहंडे, संजय कुळकर्णी, हर्षल जोशी, आशिष व्यवहारे, अशोक शर्मा,संजय टेंभीकर, नितीन दासर, प्रतेश बेदमुथा, प्रदिप सोनटक्के, विजय मोरे, पंजाबराव इलग, विनायक भाग्यवंत, पवन बगाडे, नारायण तोंडीलायता, चंद्रकांत पाथरकर, पंडीतराव सपकाळ, श्रीकृष्ण मख, किरण नाईक यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार