सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूर येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर  माफ करण्याची घोषणा करण्यात यावी.

आज मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई आणि ठाण्यातील तब्बल १६ लाख घरांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे

Snehal Joshi .
  • Jan 1 2022 7:10PM
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे. नवीन वर्ष २०२२ ची भेट म्हणून आपण आज मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई आणि ठाण्यातील तब्बल १६ लाख घरांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे, ही चांगली गोष्ट आहे.
 
नागपूरचा विचार केल्यास, नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी वसले असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. हे शहर देशाच्या प्रत्येक मोठ्या शहरांना जोडले गेले असून दळण-वळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. नागपूरमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात ५००  चौरस  फुटांपेक्षा  कमी  क्षेत्रफळ  असलेल्या  घरांच्या  वसाहती  आहेत. ज्याप्रमाणे मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर आपण माफ केलात, त्याचप्रमाणे उपराजधानी नागपूर येथील घरांसाठीसुद्धा मालमत्ता करमाफी घोषित करण्यात यावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला न्याय मिळेल.
 
आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे राज्यातील इतर शहरांचासुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मुंबई व ठाणेच्या धर्तीवर नव-वर्षाची भेट म्हणून नागपूर येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा  मालमत्ता कर  माफ करण्याची घोषणा करण्यात यावी, अशी नम्र विनंती मी आपणांस या पत्राच्या माध्यमातून करीत आहे.  अशा आशयाचे पत्र
  माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी  मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार