सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर- १० हॉटेल मानस च्या शेजारी जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या कारवाईने खळबळ

नवापूर शहर आणि परिसर गुजरात महाराष्ट्र सीमेवरील हद्दीत असल्याने अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत

Nandurbar MH
  • Oct 11 2021 12:12PM

 नवापूर शहर आणि परिसर गुजरात  महाराष्ट्र सीमेवरील हद्दीत असल्याने अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत
    पोलीस सूत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रीय महामार्ग लगत रात्री  एक वाजेच्या सुमारास हॉटेल मानस च्या शेजारी एका पत्र्याच्या शेड मध्ये झन्ना मन्ना नावाच्या जुगार खेळला जात असल्याचा बातमी वरून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे नंदुरबार नवापूर पोलीस निरीक्षक  बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात अधिकारी आणि पोलीस  ताफ्या सह छापा टाकल्यांने एकच खळबळ उडाली आहे 
   सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय महामार्ग क्र सहा वरील बेडकी शिवारा लगत हॉटेल मानस च्या शेजारी असलेल्या एका पत्र्याचा शेड मध्ये गुजरात राज्यातील व महाराष्ट्रातील जवळजवळ 16 जुगार खेळणाऱ्याना अटक करत  एक लाख पन्नास हजार चारशे रु रोख रक्कम सह  एकूण एक लाख 86 हजार पाचशे साठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत कारवाई करण्यात आली आहे 
  सदर हॉटेल परिसरात गुजरात राज्यातील अनेक वाहने उभी दिसून आल्याने ह्या ठिकाणी शेकडो च्या संख्येने जुगारी जमले असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलिसांच्या सुगावा लागताच  शेतातून अनेक  जुगारी पसार झाली असल्याची चर्चा परिसरातील नागरिकां मध्ये सुरू होती घटना स्थळी उभे असलेल्या वाहनावर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस उभे असल्याचे दिसून आले आहे 
  पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय यांचे फिर्यादी वरून गुन्हा रजीष्टर  नंबर ६६१/२०२१ जुगार कायदा कलम चार चे उलघणं केल्या प्रकरणीमनोज परमार, सुरत,
जगदिश ऊर्फ जिग्नेश पटेल सुरत, 
शैलेशभाई रंबारी, सुरत, 
तेजस मोदी, सुरत, 
कौशिकभाई गामीत बालपुर, ता. व्यारा, 
चंद्रपाल प्रजापती, सोनगड,
अरुण कोकणी, पळसी, 
इसाक पटेल. बडोदा, 
शशिकांत कोकणी शेही,
उमेशकुमार बागुल नवापाडा,  
हबीब शेख  भरुच, 
सुरेश मानकर ताहराबाद, 
विजयसिंग राणा भरुच, 
स्वप्निल मिस्तरी  नवापुर, 
किरण चौधरी नंदुरबार,                  या इसमावर नवापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून
 जुगार खेळणार्यांना ताब्यात घेत उशिरा पर्यन्त कारवाई सुरू होती घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं,पो हे का सुनिल बर्वे,विकास पाटील,गुमान पाडवी,दिलवर पावरा,दिनेशकुमार वसुले,हेमंत सैदाने,महिला पोलिस शितल धनगर, करीत आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार