सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे ऊसाला भाव मिळणार राजकीय उद्देश ठेऊन केल्या जाणाऱ्या आंदोलनाकडे शेतकरी सभासदांनी दुर्लक्ष करावे-श्रीशैल्य उटगे,

दुष्काळी परिस्थितीमुळे मागच्या वर्षी साखर कारखाने बंद होते परिणामी एफ.आर.पी. अद्याप निश्चित झालेली नाही त्यासाठी साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु आहे. सदरील तांत्रिक अडचण दुर होताच मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांकडून शेतकरी सभासदांना त्यांच्या अपेक्षेनुसार ऊसाचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे विरोधी मंडळीकडून राजकीय हेतू समोर ठेऊन केल्या जाणाऱ्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करावे, असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे यांनी केले आहे.

s.ranjankar
  • Aug 9 2021 5:08PM

 

लातूर : दुष्काळी परिस्थितीमुळे मागच्या वर्षी साखर कारखाने बंद होते परिणामी एफ.आर.पी. अद्याप निश्चित झालेली नाही त्यासाठी साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु आहे. सदरील तांत्रिक अडचण दुर होताच मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांकडून शेतकरी सभासदांना त्यांच्या अपेक्षेनुसार ऊसाचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे विरोधी मंडळीकडून राजकीय हेतू समोर ठेऊन केल्या जाणाऱ्या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करावे, असे आवाहन रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे यांनी केले आहे. मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांच्या वतीने संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळात मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची उभारणीच या परिसरातील शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी करण्यात आली आहे. या परिवारातील सर्व साखर कारखाने उत्कृष्ठरित्या चालवले जातात. आर्थिक शिस्त पाळल्यामुळे शेतकरी सभासदांच्या ऊसास अधिकचा भाव मिळतो आहे. यातून परिसरातचा सर्वांगीण विकास घडून आला आहे. महाराष्ट्राबरोबर देशातील सर्वोत्कृष्ठ कारखाने म्हणून या कारखान्यांना गौरवण्यात आले आहे. या कारखान्यांचे राज्यभरात अनेक ठिकाणी अनुकरण केले जात आहे. शेतकरी सभादांनाही मांजरा परिवारातील साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त भाव मिळणार आहे. याचा विश्वास आहे. असे असताना काही विरोधी मंडळी केवळ राजकीय हेतूने आंदोलनाचा मार्ग स्वीकारुन स्वत:कडे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागच्या वर्षात (2019-20) दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाले होते. परिणामी मांजरा परिवारातील साखर कारखान्यात गाळप होऊ शकले नाही. मागच्या वर्षीच्‍या गाळपावर एफ.आर.पी. ठरत असल्यामुळे या वर्षीच्या (2020-21) गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाची एफ.आर.पी. अद्याप निश्चित झालेली नाही. ही एफ.आर.पी. निश्चित करुन द्यावी म्हणून मांजरा परिवारातील साखर कारखान्यांकडून साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरु आहे. सन 2019-20 या गळीत हंगामात कारखाना बंद असताना एफ.आर.पी. कशी निश्चित करायची हा तांत्रिक मुद्दा असल्यामुळे हा प्रस्ताव साखर आयुक्तांडे प्रलंबित आहे. आतापर्यंत या साखर कारखान्यांकडून गाळप झालेल्या संपुर्ण ऊसाला प्रति टन 2200/- रुपये प्रमाणे अग्रीम म्हणून अदा केले आहे. एफ.आर.पी. निश्चितीमधील तांत्रिक अडचण दुर होऊन ती जाहीर होताच त्यानुसार शेतकरी सभासदांना उर्वरीत रक्कम अदा केली जाणार आहे. याची माहीती सर्व शेतकऱ्यांनाही आहे. मांजरा परिवाराकडून आपल्या ऊसाला अधिकचा भाव मिळणार याचा विश्वासही त्यांना आहे. विरोधकांनाही या वस्तुस्थितीची माहीती असताना केवळ राजकीय फायदा उठविण्यासाठी त्यांनी मांजरा परिवाराकडून एफ.आर.पी. प्रमाणे भाव मिळावा म्हणून 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. मांजरा परिवाराने मागच्या पस्तीत वर्षात शेतकरी सभासदांचे हीत जोपासले आहे. सामाजीक बांधिलकीच्या भावनेतून आजवर या परिवाराने काम केले आहे. पुढेही ते सुरुच राहणार आहे. आजवर शेतकरी सभासदांना न मागता त्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव दिला आहे आगामी काळातही ही परंपरा कायम राखली जाणार आहे. असे असताना विरोधकांनीही या क्षेत्रात राजकारण आणु नये ही सर्वांचीच अपेक्षा आहे. या परिसरातील शेतकरी सभासद सुज्ञ आहेत. आपले हीत कशात आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध करुन केवळ तांत्रिक अडचणीला मुद्दा म्हणून आंदोलन करणाऱ्या मंडळीकडे हे सुज्ञ शेतकरी दुर्लक्ष करतील हा विश्वास असल्याचेही या संयुक्त निवेदनात रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे यांनी म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार