सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जप्त मद्यसाठा परस्पर विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याविषयी अद्याप प्रश्नचिन्हच

प्रकरणी गुन्हा दाखल होण्याविषयी अद्याप प्रश्नचिन्हच

Nandurbar. MH
  • May 7 2021 12:59PM
नंदुरबार : शहरातील एका हॉटेलवर कारवाई केल्यानंतर उपनगर पोलिसांनी दारु साठा जप्त केला आणि तोच दारु साठा दुसऱ्या दारु दुकानदाराला विक्री केल्याचा कारनामा उघड होऊन दोन दिवस उलटले. तरीही एवढी गंभीर चूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्या बाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
सुदर्शन न्युज ने सर्वप्रथम या गैरप्रकाराला तोंड फोडले. ते वृत्त प्रकाशित होताच चक्र फिरले. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ताबडतोब दखल घेतली व या प्रकरणामुळेच उपनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील नंदावळकर व पो.हे.कॉ.मनोज सरदार यांना तातडीने मुख्यालयात जमा करण्यात आले असून चौकशीनंतर कठोर कारवाईचे संकेत सुत्रांनी दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असेही समजते की, स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू आहे. तीन दिवसात त्यांना अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. ही चौकशी निष्पक्ष व पारदर्शी व्हावी महणूनच निरीक्षक नंद्वाळकर आणि एक पोलिस कर्मचारी यांची मुख्यालयात तात्पुरती बदली करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे पोलिस मुख्यालयातील सूत्रांनी सांगितले आहे. 
     परंतु चौकशी पूर्ण होऊन दारू विक्री चा गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार की नाही हा प्रश्न कायम आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या घटनेची पार्श्वभूमी अशी की उपनगर पोलिसांनी एका दारु दुकानावर धाड टाकली. दारुचा साठा जप्त करीत संबंधिताविरुद्ध गुन्हाही दाखल केला. तशातच हा मद्यसाठा विक्रीचा घाट पोलिसांनी रचला. त्यासाठी एका बारचालकाला हा मुद्देमाल दाखविण्यात आला. पोलिसांच्या ताब्यातील हा मुद्देमाल त्याने खरेदीही केला आणि विक्रीसाठी दुकानात आणला. तशातच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संबंधित दारु विक्रेत्याकडे धाड टाकली. तेव्हा दारुच्या खोक्यांवर उपनगर पोलिसांचा गुन्हा क्रमांकासह कायदेशीर कारवाईचे शेरे आढळून आले. कारवाई करणाऱ्या पथकास आढळले की हा एका हॉटेलवर छापा टाकल्यावर जप्त केलेला मद्यसाठा होता. अर्थात संबंधित खोक्यांवर जप्त केल्याचे दर्शवणारे लाल लेबल होते, हा मुद्देमाल चोरीला गेला की विक्री केला, असे अनेक संशय आहेत. हा प्रकार छापा टाकणाऱ्या पथकाने वरिष्ठांना कळविला. तेव्हा उपनगर पोलिसांचे बिंग फुटले. दरम्यान पथकाने ही माहिती देताच कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत त्याची चौकशी डीवाय.एस.पी.सचीन हिरे यांच्याकडे सोपविली. तपासात अडसर नको म्हणून दोघांना तातडीने नियंत्रण कक्षात जमा केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार