प्रदेशाच्या आदेशान्वये दिनांक 21 जून 2021 ते 06 जुलै 2021 पर्यंत होणारे आगामी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज दिनांक 18 जून 2021 रोजी नवापूर शहर व नवापूर ग्रामीण मंडलाची नियोजन बैठक अग्रवाल भवन नवापूर येथे आयोजित करण्यात आली. या नियोजन बैठकीस मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, तालुकाध्यक्ष भरत भाऊ गावित, शहराध्यक्ष प्रणव सोनार, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सोशल मीडिया प्रदेश सदस्य नीलेश प्रजापती, जि प सदस्य तथा महिला मोर्चा उपाध्यक्ष संगीता ताई गावित, रमला भाई राणा,जिल्हा कार्यकारणी सदस्य दुर्गाताई गावित, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी, शहर सरचिटणीस कुणाल दुसाने, महिला मोर्चा शहराध्यक्ष जिगनिषा बेन राणा, सुनीताताई वसावे आदी विराजमान होते.
यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य समीर शहर सरचिटणीस अजय भाऊ युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भिमसिंग पाडवी यांच्यासमवेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे