सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आज ३ एप्रिल. छत्रपती_शिवाजी_महाराज_पुण्यति

जगाच्या इतिहासतील एक सर्वात काळाकुट्ट भयाण दिवस आज हां दगडाचा सह्याद्री अश्रुन्नी भिजला होता

Sudarshan MH
  • Apr 3 2021 12:04PM

जगाच्या इतिहासतील एक सर्वात काळाकुट्ट भयाण दिवस आज हां दगडाचा सह्याद्री अश्रुन्नी भिजला होता,त्या दुर्ग दुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने देखिल टाहो फोडला होता...१६८० साली याच दिवशी शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही
तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते, तारणहार राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले..
ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक, अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम..
अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय.पण गद्दरानो ख़बरदार, हा झंझावत पुन्हा जागृत होईल, लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल, ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल...
*जय शिवराय जय शिवराय जय शिवराय*
१६८० साली आजच्याच दिवशी "शककर्ते छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला. पण शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर राहतील..
शककर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या महानिर्वाणदिनी त्रिवार मुजरा...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार