नांदेड मराठा सेवा संघाच्या शिरपेचात आणखी एक सोनेरी पान
मराठा सेवा संघ ही सामाजिक संघटना गेल्या तीस वर्षापासून समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत आहे.
नांदेड. दि. ११(अरविंद जाधव). मराठा सेवा संघ ही सामाजिक संघटना गेल्या तीस वर्षापासून समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. संबंध महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन करून , रूढी, परंपरा ,खोटा बडेजाव, सण-उत्सव ,अप्रस्तुत खर्च यामध्ये अडकलेल्या मराठा समाज मराठा सेवा संघाच्या चळवळीमुळे बाहेर पडला आहे. समाजामध्ये वाढणाऱ्या अनेक समस्या ह्याचे चिंतन मराठा सेवा संघ सातत्याने करत आले आहे. आदरणीय युगनायक पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाज आता बदलाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला आहे. बुटाच्या "पॉलीस पासून केसाच्या मालिश पर्यंत"कोणतेही व्यवसाय मराठा समाजातील तरुणांनी करावेत अशा प्रकारचा संदेश युगनायक खेडेकर साहेबांनी दिला आणि मराठा सेवा संघाच्या मार्फत खूप मोठी जागृती महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये झाली आहे. मराठा सेवा संघाने सबंध महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभे करणे चालू केले. नांदेड येथे मराठा सेवा संघा मार्फत पंचवीस मुलांचे वसतिगृह मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. सद्यस्थितीमध्ये शंभर मुलींचे वसतिगृह नांदेड शहराच्या मध्यभागी मार्केट कमिटीच्या मैदानात निर्माण करणे सुरू आहे. मराठा समाजातील १०० मुली सदरील वसतिगृहामध्ये थ्री स्टार सुविधेसह राहतील अशा प्रकारची व्यवस्था सदरील वसतीगृहा मध्ये केली आहे.
आता नांदेड येथील विष्णुपुरी काळेश्वर मंदिराच्या परिसरात मराठा समाजाच्या मुलांसाठी एक नवीन वसतिगृह उभे राहणार आहे. विष्णुपुरी येथील एक समाजशील, समाजाचा कळवळा असलेले, समाजासाठी आपण काही देणे लागतो असे मानणारे, समाजहितासाठी अहोरात्र कष्ट करणारे, शिवश्री शंकररावजी हंबर्डे यांनी मराठा समाजाच्या शंभर मुलांसाठी ,आणि १०० मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची (6000)सहा हजार स्क्वेअर फूट जमीन मराठा सेवा संघ नांदेड यांना दान देण्याचा संकल्प दिनांक १० नोव्हेंबर २०२० रोजी केला आहे.तसेच शिवश्री शंकररावजी हंबर्डे यांचे चिरंजीव डॉ. प्रमोद हंबर्डे (यूरोलॉजिस्ट) व त्यांचे इतर डॉक्टर मित्र या वसतिगृहात राहणाऱ्या मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचा इलाज 50 % खर्चात सर्व सुविधा देण्याचे ठरवले आहे.
आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रस्तावित काळेश्वर येथील वसतिगृहाच्या जागेची पाहणी केली. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार ,माजी सनदी अधिकारी एकनाथजी मोरे साहेब, इंजि. शे रा पाटील साहेब, राष्ट्रीय कृषी परिषद अध्यक्ष, शिवश्री डॉ. सोपानराव क्षीरसागर ,तेलंगणा प्रभारी प्रा.डॉ. गणेश शिंदे, जिल्हाध्यक्ष शिवश्री नानाराव कल्याणकर, मारोतराव भोसले,गोविंदराव हंबर्डे, माधवराव हंबर्डे , सोपानराव हंबर्डे,गंगाधर पवार , संजय हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प