सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन मराठी’ चा आणखी एक दणका.. मुंबईतील बोगस लसीकरणाच्या चौकशीचे आदेश..

मुंबईतील बोगस लसीकरणाच्या चौकशीचे आदेश..

Sudarshan MH
  • Jun 17 2021 9:50AM
मुंबई: पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृहसंकुलात झालेल्या संशयास्पद कोविड-१९ लसीकरण प्रकाराची सखोल चौकशी करुन ४८ तासांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. दरम्यान, गृहनिर्माण संस्थांनी खासगी लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करुन, त्यांच्या नोंदणीसह सर्व बाबींची खातरजमा करुन नंतरच लसीकरण उपक्रम राबवावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सुदर्शन न्यूज ने ही बातमी प्रसारित करताच काही तासांत हे आदेश जारी झाले आहेत.
 
३९० जणांचे संशयास्पद लसीकरण
 
पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृह संकुलात सुमारे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र, लसीकरण करणाऱ्या संबंधित चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती, तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. हा सर्व प्रकार संशय निर्माण करणारा असल्याने, रहिवाशांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. या संशयास्पद लसीकरण प्रकारणाची चौकशी करुन ४८ तासांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश, सुरेश काकाणी यांनी परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांना दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार