सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नीती मुळे गमावलेच होते, कोरोना मुळे वाचले..!

चिखली पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी यांचा अजून एक प्रकार आला समोर..

Sudarshan MH
  • Nov 25 2020 10:27AM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली येथील पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेहमी वाद विवादाच्या सागरात असणाऱ्या या अधिकाऱ्यांविरुद्ध काही महत्वाच्या खात्रीलायक बाबी सूत्रांकडून प्राप्त झाल्या आहेत. या बाबींचा जर विचार केला तर हे अधिकारी या पदावर काय करीत आहेत.? आणि यांच्या अश्या वागन्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना ज्ञात असून ही ते अनभिज्ञ असल्याचे सोंग तर घेत नसावे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. एका प्रकारे ज्यांची कार्यपद्धती शासनाप्रती संशयास्पद आहे किमान अश्या लोकांना तर सहन कसे काय करता येईल हेच उमगत नाही.

जेव्हा पूर्ण जग कोरोना सारख्या संकटाला तोंड देत होते तेव्हा देशात अन्नधान्य समेत जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी होऊ नये या बद्दल शासन - प्रशासन सजग होते. याच काळात म्हणजे मार्च २०२० मध्ये एका शेतातील गोडाऊनमध्ये मोठया प्रमाणात धान्याचा साठा अवैधरित्या काही व्यक्तींनी जमवले असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती तहसीलदार चिखली यांना प्राप्त झाली होती. या माहिती वरून तहसीलदार चिखली यांनी पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी यांना सदर माहिती सांगून सदर ठिकाणी तपासणी करण्यासाठी पाठवले होते, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अवैधरित्या धान्याची साठवणूक झाली नसल्याचे निरीक्षण अधिकारी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले..
या घटनेच्या दहा पंधरा दिवसानंतरच पुन्हा त्या प्रकारची गुप्त माहिती तहसीलदार चिखली यांना प्राप्त झाली आणि पुन्हा त्याच निरीक्षण अधिकाऱ्यास तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले. आणि यावेळी सुद्धा  कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करताच त्या अधिकारी परतल्या. परंतु तहसीलदार यांनी सदर विषयाला गांभीर्याने घेत स्वतः आपल्या एका चमू सोबत संध्याकाळच्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या ठिकाणावर धाड टाकली असता तेथे मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळ अवैधरित्या साठवलेला आढळून आला. यावेळी स्वतः तहसीलदार व त्यांच्या अधीन असलेले कर्मचारी रात्रभर त्या ठिकाणी थांबून दुसऱ्या दिवशी सर्व माल ताब्यात घेऊन संबंधित लोकांविरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल केलेत हे महत्त्वाचे. या घटनेनंतर निरीक्षण अधिकारी यांची कार्यप्रणाली संशयास्पद असल्याचे सहज दिसून येऊ शकते.?
ज्या वेळी अवैध साठ्या विरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात येते, त्यावेळी शासकीय गोदामांची सुद्धा झडती घेण्यात येत असते. जेणेकरून तपास अधिकारी यांना माहिती कळते की, भेटून आलेला माल हा शासकीय गोदामातील आहे किंवा नाही. हे जाणून घेण्यासाठीच तहसीलदार यांनी पुन्हा निरीक्षण अधिकारी यांना चिखली आणि अमडापुर येथील शासकीय धान्य गोदामांची तपासणी करण्यास सांगितले होते. परंतु यावेळी सुद्धा आपल्या सवयीनुसार निरीक्षण अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाला यावेळी केराची टोपली दाखवत कोरोना काळात सुद्धा जीवनावश्यक कायद्याप्रति जागरूक राहण्याची तसदी घेतली नाही.
घडलेल्या सदर प्रकाराबद्दल तहसीलदार यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत सविस्तर माहिती आणि तक्रार लेखी स्वरूपात केली असल्याचे कळले आहे. परंतु तक्रारी करून त्यावेळी हवी तशी कार्यवाही कोरोना मूळे झाली नसल्याचे ही स्पष्ट झाले. म्हणजे जो कोरोना अख्या जगासाठी त्रासदायक झाला आहे , तोच कोरोना काहींच्या साठी वरदान ही ठरला असावा असे म्हणणे काही गैर नाही. असो...
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी चिखली चे तहसीलदार डॉ.अजितकुमार येळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर बोलण्यास साफ पणे टाळले..!
(क्रमशः)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार