परिवहन विभागातर्फे एक रुग्णवाहिका, दोन शववाहिका गांधीबाग झोनला हस्तांतरित
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मनपा परिवहन विभागातर्फे गांधीबाग झोनला एक रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आली.
बॉक्स...
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मनपा परिवहन विभागातर्फे गांधीबाग झोनला एक रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आली. यासोबतच कोव्हिडमुळे मृत पावलेल्यानंतर मृतदेह तातडीने नेता यावे यासाठी दोन शववाहिकाही प्रदान करण्यात आल्या.
नागपूर, ता. ३ : ऑक्सीजनअभावी नागरिकांचा जीव जाऊ नये. रुग्णालयात रुग्णाला ऑक्सीजनसह हलविण्याची तातडीने व्यवस्था करता यावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मनपा परिवहन विभागातर्फे गांधीबाग झोनला एक रुग्णवाहिका हस्तांतरित करण्यात आली. यासोबतच कोव्हिडमुळे मृत पावलेल्यानंतर मृतदेह तातडीने नेता यावे यासाठी दोन शववाहिकाही प्रदान करण्यात आल्या. शहर बस परिवहन सेवेतील मिनी बसला रुग्णवाहिका आणि शववाहिकांमध्ये परिवर्तीत करण्यात आले आहे.
महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर तथा आमदार प्रवीण दटके, माजी परिवहन समिती सभापती तथा परिवहन ,समिती सदस्य बंटी कुकडे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, सहायक आयुक्त अशोक पाटील, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यावेळी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी रुग्णवाहिका आणि शववाहिकांची पाहणी करून त्यामधील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. ही दोन्ही वाहने गांधीबाग झोन कार्यालयात राहतील व आवश्यकतेनुसार नागरिकांना उपलब्ध होतील, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प