सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार शहरात रामचंद्र नगर परिसरात येथे एक इसम महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला विमल/गुटका अवैद्यरित्या विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाल्याने, सदर बातमीची खात्री करणेकामी पोनी/विजयसिंग राजपूत यांनी स्था.गु.अ. शाखेचे एक पथक सदर ठिकाणी रवाना केले...
नमूद बातमीच्या ठिकाणी एक इको कंपनीची राखाडी रंगाची MH 15 FF 7243 नंबर असलेले एक वाहन एका पत्राच्या शेड मध्ये एक इसम नामे ओम गगनदास धनवानी राह-सिंधी कॉलनी,नंदुरबार हा चोरटी विक्री करतांना मिळून आला व काही माल गाडीच्या बाजूला पडलेला दिसून आल्याने, गाडीत बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन,त्याच्या ताब्यातील गाडीची व मालाची तपासणी केली असता, त्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटका मिळून आल्याने, त्यास मुद्देमालसह ताब्यात घेऊन पुढील कारवाहीकामी उपनगर पोस्टे येथे हजर केले आहे...
मुद्देमाल
एकूण--10,05,778 ₹
विमल/गुटका व एक सुजूकी कंपनीची इको गाडी...
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित साहेब व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विजय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक/विजयसिंग राजपूत,पोना/राकेश मोरे,पोना/दादाभाई मासुळ,पोशी/अभय राजपूत,पोशी/आनंदा मराठे
पोशी/राजेंद्र काटके यांनी केली आहे...