सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत अमरीश भाई यांचा दणदणीत विजय; सर्व पक्षांनी दिली भाजपाला पहिली पसंती

अमरीश भाई यांचा दणदणीत विजय; सर्व पक्षांनी दिली भाजपाला पहिली पसंती

Nandurbar MH
  • Dec 3 2020 11:08AM

 

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

धुळे नंदुरबार विधानपरिषद पोट निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा पार धुव्वा उडवला. दोनही जिल्ह्यांच्या 10 तालुक्यात काँग्रेस आघाडीकडे 200 च्या पुढे मतदान असताना त्यांचे उमेदवार अभिजीत पाटील यांना अवघे 98 मतदान मिळाले. त्यामुळे त्यांची हक्काची मते देखील त्यांना मिळाली नाहीत आणि सर्वपक्षीय मतदारांनी भाजपालाच पहिली पसंती दिली हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
बीजेपीचे अमरीश भाई पटेल यांना पहिल्या फेरीतच 332 मतदान मिळाले असून महा विकास आघाडीचे अभिजीत पाटील यांना अवघे 98 मते मिळाली आहेत तर चार मते बाद झाली आहेत. 
 धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपने दणदणीत मतांनी बाजी मारली आहे... भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे ... ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 4मतं बाद झाली तर 332 मतं अमरीश पटेल याना पडली... महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना फक्त 98 मतं मिळाली ... विशेष म्हणजे संख्याबळाचा विचार करता हि निवडणूक तुल्यबळ ठरली असती , मात्र महाविकास आघाडीने भाजपसमोर सपशल शरण पत्करल्याचे चित्र निवडणुकीत दिसून आले ... आघाडीच्या उमेदवाराला संख्याबळ असूनही मतांची तीन आकडी संख्या गाठता आली नाही, यावरून किती मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भाजपाकडे वळली हे स्पष्ट होते...   अनेक आघाडीच्या नेत्यांनी स्वतःला या निवडणुकीपासून दूर ठेवले ... हि निवडणूक केवळ औपचारिकता ठरले असेच म्हणावे लागेल .. काँग्रेसची हक्काची मतंही आघाडीच्या उमेदवारा मिळाली नाहीत .. आदिवासी मंत्री के सी पाडवी, एकनाथ खडसे, कुणाल पाटील, शिरीष नाईक अश्या नेत्यांचा महाविकास आघाडीला लाभ झाला नाही. विधान परिषद निवडणुकीतील भाजपचा हा विक्रमी विजय भाजप कार्यकत्यांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे .. या निवडणुकी निकालांमुळे भाजपचा प्रभाव या जिल्ह्यांमध्ये वाढेल, अमरीश पटेल यांची दबदबा भाजपात वाढेल आणि महाविकास आघाडीत एकसंघता नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ते निवडणूक एकत्र लढतील याबाबत शंका आहे .
निवडणूक स्थितीवर एक दृष्टिक्षेप:
एकूण मतदान - ४३७ 
झालेले मतदान - ४३४
मतदानाची टक्केवारी - ९९. ३१
लढत - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 
भाजप उमेवार - माजी मंत्री अमरीश पटेल 
महाआघाडी उमेवार - अभिजित पाटील 
धुळे जिल्ह्यातील मतदार - २३७
नंदुरबार जिल्ह्यातील मतदार - २००

असे होते पक्षीय बलाबल-
भाजप - २०३
काँग्रेस - १४८
एनसीपी -  २९
शिवसेना - ३५ 
एम आय एम - ०९
समाजवादी पक्ष - ०४
बी एस पी - ०१
मनसे - ०१
अपक्ष - ०८ 
ही निवडणूक फक्त एक औचारीकता ठरली. भाजपातून महाविकास आघाडीत आलेल्या नेत्यांचा प्रभाव अजिबात दिसला नाही. विशेष असे की  नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री  तथा काँग्रेस पक्षाचे  प्रमुख  एडवोकेट  के सी पाडवी  हे अलिप्त राहिले  तर  धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार देखील फिरकलेच नाहीत. अमरीश पटेल यांचे सर्वपक्षीय संबंध आले कामी येऊन भाजपच पहिल्या पसंतीचा पक्ष असल्याचे अन्य पक्षातील लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले. काँग्रेस पक्षच्या सदस्यांनी देखील भाजपाला मतदान केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आघाडी धर्म जोपासला नाही. अनेक ठिकाणी महाआघाडीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक निवडणुकीक!डे दुर्लक्ष केल्याचे चित्र पुढे आले. अमरीश पटेलांसमोर अभिजित पाटील फारच नवखे उमेदवार ठरले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार