सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

२१ तलवारींसह पिस्टल जप्त, पाच अटकेत,गाडगेनगर पोलिसांची कारवाई

अमरावती,गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयसियाराम नगरमध्ये राहणारा एक युवक मागील काही दिवसांपासून ऑनलाइन तलवार, पिस्टल (रिव्हॉल्वर) अशी शस्त्रे बोलावून त्याची शहरात विक्री करतो.

Snehal Joshi .
  • Feb 25 2021 11:12PM

अमरावती,गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयसियाराम नगरमध्ये राहणारा एक युवक मागील काही दिवसांपासून ऑनलाइन तलवार, पिस्टल (रिव्हॉल्वर) अशी शस्त्रे बोलावून त्याची शहरात विक्री करत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी त्याला पकडले.

पोलिसांनी त्याने विक्री केलेल्या २१ तलवारी तसेच एक पिस्टल(रिव्हॉल्वर) जप्त केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. अक्षय प्रमोद इंगळे (२०, रा. जयसियाराम नगर), समीर सुनील निकोसे, गोलू उर्फ मयूर दीपक चढार(२०), देवेंद्र उर्फ विकी संजय बागडे (२७) आणि सुरज काशिनाथ यादव (२७, रा. शोभानगर अमरावती) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले तसेच हवालदार शेखर गेडाम यांना माहिती मिळाली होती की, अक्षय इंगळेच्या घरात मोठ्या प्रमाणात तलवारी व इतर शस्त्र आहे, त्यामुळे पोलिस पथकाने अक्षयच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक रिव्हॉल्वर तसेच तलवार हे शस्त्र मिळाले. याचवेळी पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतले. त्यावेळी अक्षयने सांगितले की, त्याने आजवर अनेक तलवारी ऑनलाइन खरेदी केल्या आहेत. खरेदी केलेल्या तलवारी तो शहरातील इतर काहींना विक्री करत होता. विक्री केलेल्या तलवारी त्याने आतापर्यंत समीर, गोलू, देवेंद्र, सुरज यांना विक्री केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याही घराची झडती घेऊन त्यांना अटक केली. त्यावेळी पोलिसांना या चौघांच्या घरातून आणखी वीस तलवारी जप्त करण्यात यश आले.

ही कारवाई पोलिसांनी बुधवारी दिवसभर केली आहे. या पाचही जणांच्या घरातून पोलिसांनी एकूण २१ तलवारी तसेच एक रिव्हॉल्वर जप्त केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा मिळाल्यामुळे हे शहरात काही घडवणार तर नव्हते ना, असा प्रश्न पोलिसांसमोरही उभा झाला आहे. मात्र, गाडगेनगर पोलिसांच्या कारवाईमुळे मोठी घटना टळली, अशी चर्चा या कारवाईनंतर शहरात सुरू झाली आहे.

ही कारवाई ठाणेदार आसाराम चोरमले, एपीआय महेश इंगोले, शेखर गेडाम, सुभाष पाटील, रोशन वऱ्हाडे, उमेश भोपते, जयसेन वानखडे, पांडुरंग बुधवंत यांनी केली. अजूनही तलवारी जप्त होण्याची शक्यता अक्षय इंगळेने ऑनलाइन बोलावलेल्या तलवार व रिव्हॉल्वर विक्री केल्या. आतापर्यंत अक्षयसह पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २१ तलवारी व एक एअर पिस्टल जप्त केले. अक्षयने शहरात अजुनही काहींना तलवारी विकल्या असाव्यात, असा संशय आहे. आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार