सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वर्णद्वेषी कार्टूनमधून भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आली; व्हायरल ग्राफिकवर नेटकरी संतापले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रसंगावधान दाखवणाऱ्या भारतीय क्रू मेंबर्सचं कौतुक करत आभार मानले आहेत.

Shruti Patil
  • Mar 30 2024 7:50AM

Baltimore Bridge Collapse: अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रसंगावधान दाखवणाऱ्या भारतीय क्रू मेंबर्सचं कौतुक करत आभार मानले आहेत. यात भारतीय जास्त होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अधिकाऱ्यांनी ब्रीजवरील वाहनांची वाहतूक थांबवली आणि अनेकांचे प्राण वाचले असं ते म्हणाले. पण असं असतांना दुसरीकडे मात्र वर्णद्वेषी कार्टूनमधून भारतीयांची खिल्ली उडवण्यात आली आहे. 

घटनेच्या दुसऱ्या दिवशीच अमेरिकेतील वेबकॉमिकने या घटनेचं चित्रण करणारे व्यंगचित्र शेअर केले. ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये त्यांनी लंगोट घातलेले कर्मचारी अपघाताआधी घाबरलेले दाखवले आहेत. यामधून त्यांनी भारतीय क्रू मेंबर्सवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. 'दुर्घटनेआधीचं अखेरचं रेकॉर्डिंग,' असं म्हणत त्यांनी हा ग्राफिक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये ऑडिओही देण्यात आला आहे. या ग्राफिकमध्ये कर्मचाऱ्यांमधील संभाषण दाखवण्यात आलं आहे. इंग्लिशमध्ये बोलत असले तरी त्यांचे उच्चार मात्र भारतीय आहेत. यामध्ये ज्याप्रकारे भारतीयांचं चित्रण दाखवण्यात आलं आहे, फक्त यावरच आक्षेप घेण्यात आलेला नसून, त्यांना कमी लेखण्यात आल्याचाही संताप व्यक्त होत आहे.

हे व्यंगचित्र शेअर करताना भारतीय अर्थशास्त्रज्ञ संजीव सन्याल यांनी लिहिलं आहे की, घटनेच्या वेळी स्थानिक कर्मचाऱ्याने जहाज चालवलं होतं. "ज्यावेळी जहाज पुलावर आदळले तेव्हा त्यात स्थानिक कर्मचारी ते चालवत होता. त्यांनी अधिकाऱ्यांना सावध केलं होतं, त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. मेयरने तर त्यांचे आभार मानले असून भारतीय क्रू मेंबर्सना "हिरो" म्हटलं आहे," याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार