सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड येथील आंबवन च्या जंगलात बिबट्याचा मृत्यू

उमरखेड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबवन जंगल परिसरात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना

Sudarshan MH
  • May 8 2021 10:21AM


(मृत्युचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार )

 उमरखेड : - प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001
उमरखेड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबवन जंगल परिसरात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज ७ मे रोजी उघडकीस आली सदर बिबट्याचा मृत्यू चार दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेने वन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र उमरखेड राखीव वन कक्ष क्रमांक 757 मध्ये वन्यप्राणी बिबट मादी ही मृतावस्थेत आज ७ मे रोजी आढळून आली सदर माहिती मिळतात घटनास्थळावर उपविभागीय वनाधिकारी अमोल थोरात, मानद वन्यजीव रक्षक पांढरकवडा आर एस विरानी , सहाय्यक वनसंरक्षक तथा वनपरिक्षेत्राधिकारी भारत खेलबांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
 सदर जागेची तपासणी केली असता बिबट नाल्यात मृतावस्थेत दिसून आली . सदर मृत पावलेल्या मादी बिबट्याची तपासणी केली असता तिचे अंदाजे वय चार वर्षे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 घटनास्थळावर पशुधन विकास अधिकारी डॉ. बी एन कुंभार, डॉ. के बी मिसाळ पशुधन विकास अधिकारी यांच्यासमक्ष  बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले .
प्रथम दर्शनी सदर बिबट्या  नैसर्गिकरित्या मृत्यू पावल्याची शक्यता असल्याचे डॉक्टर बी एम कुंभार यांनी सांगितले. शवविच्छेदन करीत असताना वन्यप्राणी बिबट्याचे सर्व शरीराचे अवयव साबीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच ठिकाणी सर्वांसमक्ष वन्यप्राणी चे दहन करण्यात आले पुढील तपास उपविभागीय वनाधिकारी अमोल थोरात हे करीत आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार