सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार - अक्राळेच्या पोलिस पाटलाच्या शेतातच गांजाची शेती उघडकीस

पोलिस पाटलाच्या शेतातच गांजाची शेती आढळून आल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावात उघडकीस आली आहे.

NandurbarMH
  • Feb 27 2021 10:48PM
नंदुरबार - आक्राळेच्या पोलिस पाटलाच्या 
शेतातच गांजाची शेती उघडकीस
अक्राळे शिवारातील पोलिस पाटलाच्या शेतातच गांजाची शेती आढळून आल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आक्राळे गावात उघडकीस आली आहे. या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तालुका पोलिस यांनी संयुक्त कारवाई करून ट्रॅक्टरची एक ट्राली गांजाची रोपे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिस पाटलासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सुरू आहे. 
गांजा हा  अंमली पदार्थ म्हणून ओळखला जातो,त्यामुळे त्यावर बंदी आहे. असे असतांना चक्क  पोलीस पाटलाच्या शेतातच गांजाची शेती उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आक्राळे  गावात गांजाची शेती असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती,त्यानुसार त्यांनी तालुका पोलसांच्या मदतीने आक्राळे गावात धाड टाकली , याठिकाणी सुमारे ट्रॅकटर ची एक ट्राली भरेल एवढे गांजाची रोपे आढळून आली आहेत, ती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आली असून या प्रकरणी देविदास कृष्णा धनगर व जगन धनगर या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका पोलिस ठाण्यात सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार