सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार- गुजरात मार्गे आणून हैदराबाद कडे नेल्या जाणाऱ्या 103 उंटांचा जथ्था गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या जागृत कार्यकर्त्यांमुळे पकडला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तळोदा पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी तातडीने यावर कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार तळोदा येथील हिंदू राष्ट्र सेनेच्या गोरक्षा दलातील कार्यकर्त्यांना गुजरात मधून हैदराबाद कडे उंट रवाना केले जात असल्याची माहिती मिळाली. संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंजाल, भंडारी, चिराग पुजारी, एडवोकेट आशिष बारी यांचे मार्गदर्शन आणि सूचना घेऊन त्यांनी तातडीने माग काढला. गुजरातच्या कच्छ भागातून आणलेले 103 ऊंट घेऊन 5 चरवाह हैदराबाद कडे जात असल्याचे त्यांना कळाले. तळोदा पोलीस ठाण्यात त्यांनी याबाबत माहिती दिली तसेच गोरक्षक केतन रघुवंशी यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. गुजरात मधून खापर, अक्कल्कुवा मार्गे तळोद्यात आलेल्या त्या लोकांचा शोध घेण्यात आला. तेव्हा नर जातीचे 103 उंट त्यांच्याकडे आढळले. कागदपत्र तपासून कच्छ पर्यंतची माहिती मिळवली. कत्तलीसाठी नेले जात असल्याचे मात्र निष्पन्न झाले नाही. म्हणून खात्री झाल्यावर निरीक्षक नंदराज पाटील यांनी उंट मालकाच्या हाती सुपूर्द केले. नंतर ते पुढे रवाना झाले. हे सर्व कारवाई 27 डिसेंबर रोजी दुपारपासून रात्री पर्यंत चालू होती.