नाशिक :-प्रतिनिधी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभाग, गुंतवणूकदार फोरम च्या सदस्य कमिटीने मा.Adv. श्री श्रीधर व्यवहारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 24 मार्च 2021 रोजी श्रीमती ज्योती लाटकर मॅडम,विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था ,नाशिक भेट घेतली व खालील विषयांवर चर्चा करण्यात आली व त्यांनी सदर विषयात त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर विषय माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्याकडे कळवण्यात येईल असे आश्वासन दिले.
1.मागील महिन्याच्या दैनिकातील बातमीनुसार नाशिक जिल्ह्यातील दहा सहकारी बँकांवर आपणाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
याबाबत त्यांनी सांगितले की बँकांच्या वसुलीच्या संदर्भात लक्ष घालण्यात येईल व त्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात येऊन बँकांचे व्यवहार व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे करण्यात आलेले आहे.
सदरची बाब दैनिकांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या बँकांमधील ठेवीदारांच्या मनात शंका व संभ्रम निर्माण झालेला आहे .
2.सदर 10 बँकांवर पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना कायद्याच्या व कोणत्या कलमाच्या आधारे नियुक्ती करण्यात आली. पालक अधिकारी म्हणजे काय व त्यांचे कर्तव्य, अधिकार काय, बँकांनी त्यांच्या व ग्राहकांच्या संरक्षणासाठी कोणती तत्त्वे पाळावीत व उपाय योजना कराव्यात. तसेच पालक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याने ग्राहकांना व ठेवीदारांना कसा व कोणता फायदा होणार आहे ?
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना त्या संस्थांचे जबाबदारी असल्याने अधिकार असल्याने त्या संस्थांचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी व वसुली सारखे प्रश्न सोडवण्यासाठी सदर नियुक्त्या करण्यात आलेले आहे.
3.नाशिक मधील बऱ्याच सहकारी बँका व सहकारी पतसंस्था सध्याची एनपीए व थकबाकी ची माहिती देणारे फलक संस्थेच्या बाह्य भागावर लावत नाही?
सदर बाबतीत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून मार्गदर्शन घेऊन सहकारी बँकांना पतसंस्थांना असे फलक लावण्यासाठी सांगितले जाईल
4.तसेच कोव्हीड 19 मुळे सध्या सहकारी संस्थांना त्यांच्या वार्षिक सभा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सदर सभेसाठी चे काही मार्गदर्शक सूचना संस्थांना आपल्याकडून देण्यात आलेले आहेत काय ?
सदर विषयाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शक पत्र पाठवण्यात आलेल्या असून त्या अनुषंगानेच संस्था वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेत आहे. त्या संदर्भात तक्रार असल्यास ती लेखी कळवावी.
वरील सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन आश्वस्त करण्यात आले की सदरचा विषय वरिष्ठ कार्यालयाला कळवून योग्य ते मार्गदर्शन घेण्यात येऊन कार्यवाही केली जाईल.
सदर चर्चेस ग्राहक पंचायत महाराष्ट्र गुतवणुक फोरम नाशिक विभागाचे अध्यक्ष Adv.श्रीधर व्यवहारे नासिक महानगराध्यक्ष श्री प्रकाश जोशी , सहसचिव श्री संदीप नगरकर,प्रवासी ग्राहक संघटना सचिव श्री शिरसाठ साहेब, नाशिक महानगर आदी उपस्थित होते.