प्रतिनिधि:दिपक चव्हाण पुणे
पुणे तिथे काय उणे असा नेहमी म्हटलं जात , पुण्यातील एका न्हाव्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे . तुम्ही आता अप्र्यन्त
सोन्याचे दागिने...सोन्याची भांडी...सोन्याचा मोबाईल किंबहुना सोन्याचा मास्क बघितला असेल , पण सोन्याचा वस्तरा कधी बघितलाय का? नाही ना , जर तुम्ही सोन्याचे शौकीन असाल तर तुम्हाला सोन्याच्या वस्तऱ्यांने दाढी करता येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला देवाच्या आळंदी मध्ये जावं लागेल.
आळंदी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या रूबाब मेन्स स्टुडिओ पार्लर चे मालक यांनी आपल्या ग्राहकांसाठी चक्क चार लाख रुपये किमतीचा आठ तोळ्या चा सोन्याचा वस्तारा बनवला आहे. हा सोन्याचा वास्तरा बनवण्यासाठी त्यानी अनेक सोनारांशी सम्पर्क केला. हा सोन्याचा वस्तरा बनवून देण्यासाठी कोणताही सराफ तयार झाला नाही .परतुं त्यानी हा वस्तारा आपल्या ग्राहकांसाठी राजस्थानच्या कारागिरांकडून बनवून घेतला आहे . या सोन्याचा वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी फक्त 100रूपये दर ठेवण्यात आले आहेत.
हा सोन्याचा वस्तारा बनवण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे याबाबत त्यांना विचारला असता ते अविनाश बोरुंदीया यांनी सांगितले कि , भारतीय संस्कृतीनुसार सोन हे पवित्र मानल जात. सोन्याचा सहवास हा आरोग्यदायी असतो. तो एक राजस धातू आहे . तो प्रत्येकाने घालायला पाहिजे त्यांच्या संपर्कात प्रत्येकाने यायला पाहिजे , पण दुर्दैव असं की प्रत्येकालाच ते सोन घालन शक्य होत नाही. कारण ते खूप महाग आहे. म्हणून सामान्यातल्या सामान्य जनते च सोनेरी स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक ग्रहाकाला पाच मिनिटे का होईना सोन्याचा स्पर्श व्हावा या उद्देशाने सोन्याचा वस्तारा बनविण्यात आला आहे . सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी नागरिक देखील गर्दी करताना दिसून येत आहेत .अविनाश बोरुंदीया यांच्या या रुबाब मेन्स पार्लर ला भाजपचे आमदार गोपीचंद पडवळकर यांनी देखील भेट दिली आणि या अनोख्या संकल्पनेची स्तुती केली आहे