सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजापाच्या त्या १२ आमदाराच्या निलंबना विरोधात जिल्हाभरात आंदोलन

विधान सभेच्या अधिवेशनात हंगामी अध्यक्षाने भाजपाच्या १२ आमदाराला गोंधळ घातला म्हणून निलंबीत केलेल्या निर्णयाच्या विरोधात आज निलंगा , कासार सिरसी येथे भाजपा च्या वतीने निदर्शने करण्यात आली व आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देवून निलंबनाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणा-या भाजपाच्या बारा आमदारांना विधान सभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी एक वर्षासाठी निलंबीत केले

s.ranjankar
  • Jul 6 2021 4:55PM
 
लातूर:विधान सभेच्या अधिवेशनात हंगामी अध्यक्षाने भाजपाच्या १२ आमदाराला गोंधळ घातला म्हणून निलंबीत केलेल्या निर्णयाच्या विरोधात आज निलंगा , कासार सिरसी येथे भाजपा च्या वतीने निदर्शने करण्यात आली व आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देवून निलंबनाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणा-या भाजपाच्या बारा आमदारांना विधान सभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी एक वर्षासाठी निलंबीत केले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून निलंगा येथे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सुचनेनुसार व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून व निदर्शने करून निषेध नोंदवला गेला तर कासार सिरसी मंडळात आघाडी सरकारला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. राज्यातील आघाडी सरकारने अनेक घोटाळे केले आहेत तसेच कायदा सुव्यवस्था ही अबाधीत राहीली नाही त्यामुळे अधिवेशतात शासनाची आणखी फजीती होईल यामुळे सरकारने जाणीवपूर्वक दोन दिवसाचे अधिवेशन ठेवून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला निलंबित झालेल्या बारा आमदारामध्ये अभिमन्यू पवार यांचा समावेश असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले कासार सिरसी मंडळात मा. उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले तर निलंगा येथे जा. प. उपाध्यक्षा भारतबाई साळूंके , शाहूराज थेटे, विरभद्र स्वामी , अजित माने ,कूमोद लोभे, तुकाराम माळी, संजय हलगरकर रवी फुलारी, सुमित इन्नानी, तम्मा माडीबौने, प्रशांत पाटील, मनोज पवार, नागेश पाटील, अर्जुन पोळ, यांच्या उपस्थिती मध्ये आंदोलन करण्यात आले.
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार