सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे…; शरद पवार, संजय राऊतांवर भातखळकरांनी साधला निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाल्यानंतरच पडद्याआड बरंच काही शिजत असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Sudarshan MH
  • Jun 22 2021 11:55AM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाल्यानंतरच पडद्याआड बरंच काही शिजत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली. याचसंदर्भात शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक होत असून, या सर्व घडमोडींवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून निशाणा साधला.

“भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे,” असा टोला अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार